• बलात्काराशी लढताना

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 7, 2013 04:56 PM IST | Updated On: May 14, 2013 03:11 PM IST

    07 जानेवारीउस्मानाबाद येथील राहणारी ही बहाद्दूर मुलीची ही कहाणी. नोव्हेंबर 2007 मध्ये तिच्यावर बलात्कार झाला. बलात्कार करणारा दुसरा तिसरा कोणी नसून जनतेचा तो रक्षक. पण त्याने भक्षकाचे काम करून पोलीस दलाची अब्रुच वेशीवर टांगली. अशोक लव्हाटे असं या नराधामाचं नाव. पीडित मुलीने त्याच्याविरोधा बलात्कारानंतर लेखी तक्रार दिली. पण पोलीसच पोलिसांविरोधात कशी तक्रार घेणार ? म्हणून की काय, सात महिन्यांनंतर म्हणजे एप्रिल 2008 मध्ये तिच्या तक्रारीचा एफआयआर नोंदवण्यात आला. आणि तेव्हा तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपी किशोर लव्हाटे याच्याकडून कोणतेही पुरावे अजून मिळवण्यात आलेले नाहीत. न्यायासाठी झगडणार्‍या या पीडित मुलीनं गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासनं दिलं. पण ते आश्वासन प्रत्यक्षात उतरलच नाहीत. एफआयआर दाखल करण्यात तब्बल सात महिने उशीर केलेल्या तत्कालीन पोलीस निरिक्षक एल.एम. वडजे यांच्याविरोधात 2011 साली अहवालही आला. त्यांच्यामुळेच एफआयआर दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पण वडजे यांच्याविरोधात गृहखात्यानं कुठलीही कारवाई केलेली नाही. एल.एम. वडजे ऍडिशनल एसपी म्हणून निवृत्तही झाले. पण मुलीचा न्यायासाठी लढा अजूनही सुरू आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातला आरोपी किशोर लव्हाटे अजूनही पोलीस सेवेतच आहे. आरोप झाल्यानंतर त्याचं फक्त निलंबन करण्यात आलंय. मात्र दोन वर्ष होऊनही त्याची खात्यांतर्गत चौकशीही झाली नाही. बलात्कारासोबतच मुलीवर शारिरिक अत्याचार करणं आणि अश्लील फोटोग्राफी करण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. सरकारी वकिलानं अतिशय धीम्या पद्धतीनं मुद्दे मांडल्यानं सेशन कोर्टात ही केस सात वर्ष पडून आहे. आयबीएन-लोकमतचे सवाल2008 साली गुन्हा दाखल झालेल्या या केसची दखल सरकार कधी घेणार ?तक्रार दाखल करायला दिरंगाई केलेल्या तत्कालीन पीआय एल.एम. वडजे यांच्यावर कारवाई कधी होणार ?निलंबित पोलीस किशोर लव्हाटे याची खात्यांतर्गत चौकशी आर.आर. पाटील लावणार का ?न्यायासाठी झगडणार्‍या मुलीला सक्षम वकील देणार का ?ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार का ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी