• होम
  • व्हिडिओ
  • 'फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात ती कमेंट हॅकरने टाकली'
  • 'फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात ती कमेंट हॅकरने टाकली'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 29, 2012 12:10 PM IST | Updated On: Nov 29, 2012 12:10 PM IST

    29 नोव्हेंबरपालघरमध्ये फेसबुक प्रकरण ताजे असतानाच बुधवारी आणखी एका तरूणांने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दात मजकूर पोस्ट केला होता. त्यामुळे संतापलेल्या मनसेसैनिकांनी या तरूणांना पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण पोलीस तपासात हे अकाऊंट हॅक झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात आयटी कलम 66 (अ) गुन्हा नोंदवला आहे. समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच अशाप्रकारची कमेंट करण्यात आल्याचा आरोप या तरुणानं केला आहे. पालघरमध्ये राहणार सुनील विश्वकर्मा या तरूणांच्या फेसबुक अकाऊंटवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अश्लिल, आक्षेपार्ह शब्दात मंगळवारी रात्री मजकूर पोस्ट करण्यात आला. अगोदरच एक 'पालघर' प्रकरण ताजं असल्यामुळे एकच खळबळ उडाली.म् ानसे जिल्हाध्यक्ष कुंदन संख्ये आण्ि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुनीलचं घरं गाठलं. तोपर्यंत सुनीलच्या घराबाहेर अगोदरच शेजारी आणि मित्रांची गर्दी झाली होती. तुमच्या मुलाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकला त्याला आमच्या ताब्यात द्या असं सांगून मनसेसैनिकांनी त्याला सोबत नेलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांना पहिल्या प्रकरणाचा नुकताच अनुभव आला होता. त्यामुळे पोलिसांनी सायबर सेलला ही घटना कळवली. सायबर सेलच्या कर्मचार्‍यांनी सुनीलचं अकाऊंट तपासले असता पासवर्ड मॅच होतं नव्हता ते ब्लॉक झाल्याचा लक्षात आलं. यासाठी नंतर ठाणे सायबर सेलची मदत घेण्यात आली. इथंही तेच घडलं. काही वेळाने फेसबुकचा पासवर्ड मॅच झाला. त्याच्या अकाऊंटशी छेडछाड केल्याचं उघड झालं. सुनीलने याबदल विचारपूस केली असता तो म्हणाला, माझ्या घरी कॉम्प्युटर आहे पण तो बंद आहे त्यामुळे मी घरी इंटरनेटचं कनेक्शन घेतलं नाही. मी मोबाईल फोनवरूनच इंटरनेट वापरत होतो. पण ज्या दिवशी माझ्या फेसबुक अकाऊंटवरून राज ठाकरे यांच्याविरोधात कमेंट पोस्ट करण्यात आली त्यादिवशी माझ्या मोबाईलचे बॅलन्स शुन्य होते. त्यामुळे मला इंटरनेट वापरता आले नाही. त्या दिवशी पालघर बंद असल्यामुळे रिचार्ज ही करता आले नाही. रात्री त्यादिवशी कोणी तरी माझं अकाऊंट हॅक करून ती पोस्ट टाकली होती. पालघरमध्ये अगोदरचे प्रकरण लक्षात घेत मी फेसबुकवर कोणालाही कमेंट टाकण्याअगोदर 10 वेळा विचार करून कमेंट टाकत होतो. या प्रकरणात मला मनसेसैनिकांनी कोणताही त्रास दिली पोलिसांनी खूप सहकार्य केलं असा खुलासा सुनील विश्वकर्माने केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी