S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सतीश शेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयचा नव्यानं तपास
  • सतीश शेट्टी हत्याप्रकरणी सीबीआयचा नव्यानं तपास

    आईबीएन लोकमत | Published On: Oct 30, 2012 04:15 PM IST | Updated On: Oct 30, 2012 04:15 PM IST

    सुधाकर काश्यप,मुंबई30 ऑक्टोबरआरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरु आहे. पण सीबीआयने तपास हातात घेतल्यानंतर पोलिसांची थेअरी अमान्य केली आहे. सीबीआयने आतापर्यंत पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचार्‍यांचीसुद्धा चौकशी केली आहे. सतीश शेट्टी.. पुण्यातल्या तळेगावातले सामाजिक कार्यकर्ते. जानेवारी 2010मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर आरटीआय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. हत्या होण्यापूर्वी सतीश शेट्टी आयआरबीच्या जमिनी खरेदी विरोधात काम करत होते. पण पोलिसांनी तपास करताना मात्र आयआरबीचा उल्लेख टाळला. या प्ररकरणात पोलिसांनी तक्रारदाराचं दुर्लक्ष करून ऍड. विजय दाभाडे यांना मुख्य आरोपी केलं. पण पोलिसांच्या या भूमिकेला पुढे आव्हान देण्यात आलं.शेट्टींच्या हत्येआधी...- ऑगस्ट 2009: सतीश यांनी आयआरबीबद्दल माहिती काढायला सुरवाती केली- सप्टेंबर 2009: जमीन खरेदीत बोगस व्यवहार झाल्याचा आयजीआरचा अहवाल- ऑक्टोबर 2009: लोणावळा पोलीस स्टेशनात जमीन खरेदीबाबत गुन्हा दाखल- अश्विनी क्षिरसागर, वीरेंद्र म्हैसकर, रामचंद्र बालगुंडे, गाडगीळ यांच्या विरोधात गुन्हा- नोव्हेंबर 2009: जमीनीबाबतचे शेकडो दस्त रद्द- नोव्हेंबर 2009: रोजी सतीश यांनी संरक्षणासाठी अर्ज केला होता- नोव्हेंबर 2009: आपल्या जीवाला आयआरबीकडून धोका असल्याचं सतीश यांनी लिहिलं होतं- जानेवारी 2010: सतीश यांची हत्या झाली.पोलिसांनी केलेला सर्व तपास बाजूला सारून सीबीआयने नव्याने तपास सुरु केलाय. आतापर्यंत 22 जणांची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. यात आयआरबीशी संबधीत तीन व्यक्ती आहेत. सीबीआय आता योग्य दिशेने तपास करतंय, असं आता शेट्टींचे कुटुंबीय म्हणत असले, तरी सीबीआयने केस हातात घेतल्यानंतर तपासाला वर्षभराचा उशीर का केला, असा प्रश्नही विचारत आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा?सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 रोजी हत्या झाली. धारदार शस्त्राने सतीशच्या मानेवर, चेहर्‍यावर, अंगावर, पायावर वार करण्यात आलेत. पण सुरुवातीपासून या गंभीर घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. त्यांचं म्हणणं आहे की..- घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही- नाका बंदी केली नाही- फॉरेन्सिक पुरावे गोळा केले नाहीत- सतीशच्या मित्रांचे जबाब घेतले नाहीत- सतीश यांचा भाऊ संदीपने आपल्या जबाबात सतीश यांच्या हत्येमागे आयआरबी कंपनीचे संचालक असावेत, असा संशय व्यक्त केला- पण पोलिसांनी आयआरबीच्या संचालकांचं नाव एफआयआरमध्ये घेणं टाळलंसतीश यांचे भाऊ संदीप शेट्टी म्हणतात, मी माझा जबाब देताना सतीश यांची हत्या आयआरबीच्या लोकांनी केल्याचं म्हटलं पण पोलिसांनी माझं ऐकलं नाही.पोलिसांनी सुरुवातीपासून वेगळीच थेअरी बनवली. संतोष शिंदे नावाच्या व्यक्तीने अँडव्होकेट विजय दाभाडे यांना सुपारी देऊन सतीश शेट्टींची हत्या केली. असं दावा करत पोलिसांनी विजय दाभाडेंना अटक केली. विजय दाभाडे यांच्या विरोधात सतीश यांनी तक्रार केली होती. त्यामुळे दाभाडे यांचं नुकसान झालं होतं. मात्र, या प्रकरणात आपल्याला गोवलयं, असं विजय दाभाडे यांचं म्हणणं आहे.दीड वर्षा नंतर हि पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षिदार मिळवण्यात अपयश आलंय. पोलिसांनी सुरुवातीपासूनच एफआयआरमध्ये आयआरबीचं नाव येऊ न देणं, संतोष शिंदेचं त्याच दिवशी कबूली जबाब देणं, सतीश यांचा IRBविरोधातील तक्रारी बाबतचा अर्ज लपवणं.. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांच्या तपासाबद्दल सीबीआयनेही संशय व्यक्त केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close