• यश चोप्रा यांची शेवटची मुलाखत

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 22, 2012 10:27 AM IST | Updated On: Oct 22, 2012 10:27 AM IST

    22 ऑक्टोबरगेल्याच महिन्यात 27 सप्टेंबरला यश चोप्रा यांचा ऐंशीवा वाढदिवस दिमाखात साजरा झाला. त्यावेळी अभिनेता शाहरुख खाननं त्यांची खास मुलाखत घेतली होती. सिनेसृष्टीतल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल त्यांनी दिलखुलास बातचीत केली होती. हीच त्यांची शेवटची मुलाखत ठरली. या मुलाखतीला संपूर्ण बॉलिवूड हजर होतं. यावेळी यशजींनी यापुढे आपण सिनेमा बनवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पुढील महिन्यात त्याचा 'जब तक है जान' हा सिनेमा रिलीज होतोय हा सिनेमा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. यश चोप्रांनी 1956 ला सहाय्यक दिग्ददर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली..एक ही रास्ता हा त्यांचा पहिला चित्रपट..यानंतर 1959 साली धुल का फुल या चित्रपटाला त्यांनी पहिलं दिग्ददर्शन केलं. आणि मग रोमँटिक सिनेमांचा सिलसिला चालूच राहिला. 1973 मध्ये यश राज फिल्म्सची स्थापना झाली आणि दाग, दिवार, त्रिशुल, कभी कभी , सिलसिला, मशाल, चांदनी .. यशाचा सिलसिला सुरूच राहिला. यशराज फिल्म्स म्हटलं की थिएटरमध्ये गर्दी होणारच.. यशजींनी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अनिल कपूर, श्रीदेवी, रेखा अनेक स्टार्सना वेगळ्या भूमिका करायची मोठी संधी मिळाली. सिनेमा रोमँटिक असला तरी प्रेमाची अनेक रूप दाखवण्यात यशजी माहीर होते. फिल्म फेअर ऍवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार, पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार.. अशा अनेक पुरस्कारांनी यशजी सन्मानित होते. पण म्ाहत्त्वाचा पुरस्कार म्हणजे रसिकांचं प्रेम.. यशजींच्या सिनेमातलं प्रेम, प्रेमाची महती त्यांच्या फॅन्सच्या मनात नेहमीच रुंजी घालत राहील. यशजींचा शेवटचा सिनेमा जब तक है जान या दिवाळीत रिलीज होईल. त्यावेळी पुन्हा एकदा प्रेमाचं अनोखं रूप पाहून डोळे नक्कीच पाणावतील आणि यशजींना हीच आदरांजली ठरेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading