• सुप्रियाताईंची 'दादागिरी'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 11, 2012 01:35 PM IST | Updated On: Oct 11, 2012 01:35 PM IST

    11 ऑक्टोबरयुवती मेळाव्यातून युवती शक्तीचा नारा देणार्‍या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा संतापाचा तडाखा पाह्याला मिळाला.बुलडाण्यामध्ये आज गुरुवारी राष्ट्रवादी युवती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील मुलींना या मेळाव्यासाठी आणलं असा आरोप बुलडाण्यातील भाजपा महिला कार्यकर्त्यांनी केला. याचा निषेध करण्यासाठी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. 'ये माझ्याशी नीट बोलायचं' असा दमच ताईंनी कार्यकर्त्यांना भरला. यावेळी सुप्रिया सुळेंच्या अंगरक्षकांनीही या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading