• सचिन 'क्लीन बोल्ड'!

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 4, 2012 03:40 PM IST | Updated On: Sep 4, 2012 03:40 PM IST

    04 सप्टेंबरसचिन तेंडुलकरने म्हणजे रेकॉर्ड, सचिनने सेंच्युरी केली तरी रेकॉर्ड आणि तो आऊट झाला तरी रेकॉर्डच... आणि आता तर त्याने क्लीन बोल्डची हॅट्‌ट्रीकच केली आहे. तशी क्लीन बोल्ड होण्याची ही सचिनची पहिली वेळ नाही. पण यावेळी त्याच्या संबंध जोडला जातोय तो थेट त्याच्या निवृत्तीशीच... सचिन तेंडुलकर, गेली दोन दशकं या नावानं क्रिकेट जगतावर अधिकराज्य केलं आहे. बॅटिंगचे सर्व रेकॉर्ड सचिनने आपल्या नावावर केले आहे. सर्वाधिक सेंच्युरी, सर्वाधिक रन्स सचिनच्याच नावावर आहेत. सचिन बॅटिंगला आला की मैदानात एकच आवाज घुमतो तो सचिनच्या नावाचा. पण आता हा आवाज काहीसा शांत झालाय. आता सचिन मैदानात आला की एकच आवाज येतो म्हणजे बॉल स्टम्पवर आदळल्याचा..होय सचिन न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये सचिन एक दोन नव्हे तर सलग तीनवेळा क्लीन बोल्ड झालाय आणि तेही अगदी स्वस्तात. आणि आऊट होण्याची पद्धतही तिच, बॅट आणि पॅडमधली गॅप. सचिनच्या क्लीन बोल्ड होण्यावर कॉमेंट्रीबॉक्समध्ये बसलेल्या सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर यांनीही प्रश्न उपस्थित केला. "सचिन सलग क्लीन बोल्ड होतोय, बॅट आणि पॅडमधून बॉल स्टम्पवर आदळतोय..हे चिंताजनक आहे. आपण ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पाहिलं.राहुल द्रविडही सलग क्लीन बोल्ड होत होता. महान बॅट्समनसाठी हे चांगलं लक्षण नाही."सुनील गावसकर यांच्या या वक्तव्याला संजय मांजरेकर यांनीही पाठिंबा दिला."वय वाढलेल्या खेळाडूंच्या बाबतीत हे नेहमीच घडतं, फूल लेंथ बॉल खेळणं त्यांना कठीण जातं.ऑस्ट्रेलिया दौर्‍यात लक्ष्मणच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. जावेद मियांदादला कारकीर्दीच्या शेवटी असाच सामना करावा लागला होता." गेली तेवीस वर्ष खेळणार्‍या सचिनवर अनेकवेळा टीकाही झाली. पण प्रत्येकवेळी सचिननं आपल्या बॅटनं त्यांना चोख उत्तर दिलं. पण आता वाढत्या वयाच्या वास्तव टीकेला सचिन कसं उत्तर देतो हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close