विधासभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा, 'वंचित'ची भूमिका जाहीर

विधासभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी घोषणा, 'वंचित'ची भूमिका जाहीर

काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

सोलापूर, 08 मे : लोकसभा निवडणुकांच्या निकालाची प्रतिक्षा असताना आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा निवडणुक ही स्वतंत्र लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील 48 जागा वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याची घोषणा केली होती. आंबेडकरांचा हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात होता. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली होती. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमान या पक्षासह जवळजवळ 100 लहान राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.

आंबेडकरांनी जे समिकरण लोकसभेसाठी वापरलं तेच समिकरण त्यांनी विधानसभा निवडणुकांसाठी वापरण्याचा प्लान केला आहे. पण असं असलं तरी आता लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी किती बाजी मारते यावरच विधानसभेचा निकाल अवलंबून आहे.

पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवार नाही

सोलापूरमध्ये बोलत असताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पंतप्रधान पदासाठी आपण राहुल गांधींपेक्षा मायावतींना निवडू पण शरद पवारांना निवडणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही पाहा : SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा नारायण राणेंना काय होता प्रस्ताव?

तर यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला. मोदींचा तोल सुटला असावा म्हणून त्यांनी राजीव गांधींवर टीका केलं असं आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान वैयक्तिक टीका करतात म्हणजे त्यांना निवडणूक मोदींच्या हातातून निसटत चालली आहे. अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला होता.

सोलापूर की अकोला, दोन्ही जागी जिंकल्यास कोणती सोडणार? आंबेडकर म्हणाले...

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या पंतप्रधानपदाच्या दावेदार ठरू शकतात, असं म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा सुरु झाली होती. आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश आंबेडकर यांनीही पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.

'देशाचा आगामी पंतप्रधान हा काँग्रेस किंवा भाजपचा नसेल. त्यामुळे राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. निवडणुकींनंतर माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात,' असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला होता.

SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर' नाशिकमध्ये भाजपला ठरू शकतं का धोक्याचं?

First published: May 8, 2019, 10:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading