• तुकोबांच्या पालखीचं चौथं रिंगण संपन्न

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jun 25, 2012 12:26 PM IST | Updated On: Jun 25, 2012 12:26 PM IST

    25 जूनतुकाराम महाराजांच्या पालखीचं आज अकलूजमध्ये रिंगण पार पाडलं. तुकोबांच्या पालखीचं हे चौथं गोल रिंगण होतं. दरम्यान, पालखीला आज सकाळी निरा स्नान घातलं गेलं. इंदापूर तालुक्यातल्या चराटी इथे हा सोहळा पार पडला. पण अजून पाऊस नाही, दुष्काळामुळे नीरा नदी कोरडी आहे. त्यामुळे टँकरनं पाणी आणून तुकोबांच्या पालखीला स्नान घातलं गेलं. गावातल्या महिलांनी घरुन हंड्यांतूनही तुकोबांच्या स्नानासाठी पाणी आणलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी