• 'ऑफिसबॉय' पुरषोत्तम रात्र प्रशालेत पहिला

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 27, 2012 03:48 PM IST | Updated On: May 27, 2012 03:48 PM IST

    गोपाल मोटघरे, पुणे27 मेबारावीच्या वाणिज्य शाखेच्या परीक्षेत रात्र प्रशाला यादीत पुणे विभागात सर्वप्रथम आला आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सुद्धा पुरूषोत्तम गोणे यांनं रात्र प्रशाला गुणवत्ता यादीत 72.50 % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. बायडिंगचं काम करणारे वडील, बिडी कामगार आई आणि शिकणारी बहीण, अशी एकूण घरची परिस्थिती असतानासुद्धा शिक्षणाचे धडे घेण्यासाठी पुरूषोत्तम गोणे हा विद्यार्थी दिवसा एका ऑफिसमध्ये ऑफिसबॉयचं काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत त्यांनं रात्र प्रशालेत पुणे विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. पुरुषोत्तमच्या या यशासाठी त्याच्या आई-वडिलांनी खूप कष्ट उपसले. पुरूषोत्तम गोणेच्या यशाला पाहून आता त्याच्या शाळेच्या शिक्षण संस्थेनं सुद्धा त्यांला पुढील उच्चशिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी