• लादेन संपला, पण दहशतवाद ?

    आईबीएन लोकमत | Published On: May 2, 2012 05:34 PM IST | Updated On: May 2, 2012 05:34 PM IST

    02 मेजगभर दहशत पसरवणारा अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या खात्म्याला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरानंतर त्याची दहशतवादी संघटनाही आता निष्क्रिय झालीय की मग आताची शांतता ही वादळापूर्वीची शांतता आहे..1 मे 2011 ची मध्यरात्र... कानठाळ्या बसवणार्‍या हेलिकॉप्टरच्या आवाजाने पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये लोकांची झोप उडवली. हे हेलिकॉप्टर्स होते अमेरिकेच्या सर्वात शक्तीमान अशा नेव्ही सील्स जवानांचे. या नेव्ही सिल्सनं अवघ्या 40 मिनिटात ओसामाला पकडलं, त्याचा खात्मा केला आणि त्याचा मृतदेह घेऊन अमेरिकेला निघूनही गेले. अमेरिकेच्या हाती फक्त ओसामा लागला. त्यानं ज्या अतिशय जहाल संघटनेला जन्म दिला त्या अल कायद्याच्या इतर नेत्यांना मात्र अमेरिका पकडू शकलेली नाही. त्यामुळे ओसामाच्या मृत्यूनंतर अल कायदा कमकुवत झालीय का, हा प्रश्न उरतो. पण काही तज्ज्ञांच्या मते ही संघटना आता खिळखिळी होत चालली. अल-कायदा खिळखिळी ? - अल-कायदाने न्यूयॉर्क, लंडन, माद्रीद, बाली आणि इतर ठिकाणी केलेल्या हल्ल्यांसारखे मोठे हल्ले ओसामाच्या मृत्यूनंतर झाले नाहीत- अरब राष्ट्रांमध्ये झालेल्या क्रांतीवरही अल-कायदाचा नगण्य परिणाम दिसला- अफगाणिस्तानातही परिस्थिती सुधारतेय. अल कायदाचे काहीसे कार्यकर्तेच आता इथे उरलेत- ओसामाचा उत्तराधिकारी अयमान अल-झवाहिरी कधी-कधी इंटरनेटवरुन आपली उपस्थिती दाखवत असला तरी तो शांतच आहेएकंदरीत अल-कायदाची शक्ती आता क्षीण होत चालल्याचं दिसतंय. पण ती पूर्णपणे संपलेली नाही. पाकिस्तानात अल-कायदाचे अतिरेकी आता टीटीपी (TTP) आणि लष्कर-ए-तोएबासारख्या इतर अतिरेकी संघटनेशी संधान बांधत असल्याचं अबोटाबादमध्ये सापडलेल्या कागदपत्रांवरुन दिसतं.अफगाणिस्तानात अल-कायदाच्या अतिरेक्यांची संख्या कमी झालीय. पण इथून अमेरिकन सैन्य गेल्यावर पुन्हा तालिबान्यांच्या हाती सत्ता आली तर मात्र अल-कायदा पुन्हा सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे. येमेन आणि सोमालियामध्ये अल-कायदाचे अतिरेकी आणि सरकार यांच्यात अधून-मधून संघर्ष सुरु असतो.याशिवाय अल-कायदा सीरिया आणि लिबियासारख्या अरब राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या क्रांतीत बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवठा करत असल्याचीही माहिती मिळतेय. एकंदरीत अतिरेक्यांसाठी अतिशय सुरक्षित समजल्या जाणार्‍या काही भागांमध्ये आणि या भागातल्या लोकांच्या मनात असलेल्या अमेरिकेबद्दलच्या द्वेषामध्ये ओसामानं पेरलेली दहशतवादाची बीजं अजूनही आहेत. ती किती फळतात, हे येणारा काळच ठरवेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close