• होम
  • व्हिडिओ
  • सचिनच्या खासदारकीवरुन राजकारण्यांची 'बॅटिंग'
  • सचिनच्या खासदारकीवरुन राजकारण्यांची 'बॅटिंग'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 27, 2012 11:59 AM IST | Updated On: Apr 27, 2012 11:59 AM IST

    27 एप्रिलराज्यसभेची खास दारकी स्वीकारण्यास सचिन तेंडुलकरने तयारी दाखवली असली तरी आता यावरुन राजकारण आखाडा तापायला लागला आहे. राजकीय नेत्यांनी सचिनच्या खासदारकीवरुन बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरले आहे. आता सचिन सारख्या महान खेळाडूने काँग्रेसमध्ये यावं त्यांच्या योगदानामुळे पक्षाला मोठा फायदा होईल त्याचं पक्षात स्वागत आहे असं आवाहन काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केलं आहे. पण भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या काँग्रेसने सचिनच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. तर सौरव गांगुलीलाह खासदारकी का दिली नाही असा सवाल सीपीआयचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केला. तर मायावती यांनी वेगळाच सुर लगावला. आता सचिन राजकारणात आला आहे तर त्यानी त्यांच्या कर्तत्वाचा ठसा राजकारणात उमटावा, आपलं करिअर उज्ज्वल करावे असा सल्ला मायावती यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी