• राजकारणात उतरणार सचिन पहिला नाही !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 26, 2012 05:30 PM IST | Updated On: Apr 26, 2012 05:30 PM IST

    राजू कासले, नवी दिल्ली26 एप्रिलराजकारणात प्रवेश करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला क्रिकेटर नाही. सचिन तेंडुलकरने आज काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांची दहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज्यसभेसाठी सचिन तेंडुलकरच्या नावाची काँग्रेसकडून शिफारस करण्यात आल्याचं वृत आलं आणि एकच चर्चा रंगली सचिननं राजकारणात प्रवेश करावा की नाही ? राजकीय नेत्यांनी या वृत्ताचं स्वागत केलं. तर क्रीडा जगतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पण राजकारणात प्रवेश करणारा सचिन हा काही पहिला क्रिकेटर नाही. राजकारणात क्रिकेटर्सना नेहमीच चांगली मागणी आहे. भारताचा माजी कॅप्टन अझरनं राजकारणात आपलं नशिब अजमावलं. काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही अझर आता खासदार झाला.नवज्योत सिंग सिद्धुने क्रिकेटनंतर राजकारणातही आपला ठसा बर्‍यापैकी उमटवलाय. सिद्धुने गेल्या दोन निवडणुका जवळजवळ 1 लाखाच्या फरकाने जिंकल्या आहेत. याशिवाय किर्ती आझाद , रॉजर बिन्नी आणि चेतन चौहान यांनीही खासदारकी भुषवली आहे.क्रिकेट मैदानात बॉलर्सने ठेवलेल्या अनेक आव्हानांना सचिननं नेहमीच आपल्या बॅटने उत्तर दिलंय. आता क्रिकेटमधला हा अनुभव त्याला राजकारणात किती उपयोगी पडतोय त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close