• रिसॅट-1 उपग्रहाची यशस्वी भरारी

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 26, 2012 05:38 PM IST | Updated On: Apr 26, 2012 05:38 PM IST

    26 एप्रिलअग्नि-5 च्या यशस्वी चाचणीनंतर भारताने आज पूर्णपणे भारतीय बनावटीचा एक नवा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात सोडला. रिसॅट-1 असं या उपग्रहाचे नाव आहे. श्रीहरी कोटाच्या सतिश धवन अंतराळ केंद्रवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलंय. हवामानाचा अंदाज वर्तवण्याचं मुख्य काम हा उपग्रह करणार आहे. पण या उपग्रहाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही वातावरणात अगदी धुकं आणि ढगाळ वातावरणातही, दिवसा आणि रात्री या उपग्रहातून स्पष्ट चित्र घेता येतात. पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या क्षमतेमुळे शेतीसाठी या उग्रहाची मदत होणार आहे. शिवाय पूर, वादळ असा नैसर्गिक आपत्तींचा अंदाजही रिसॅट-1 वर्तवणार आहे. अतिशय सुस्पष्ट चित्र घेण्याच्या क्षमतेमुळे भारतीय सीमांच्या संरक्षणासाठीसुद्धा रिसॅटची मदत होईल. रिसॅट-1ची वैशिष्ट - 5 वर्षांची कालमर्यादा- सर्वात जास्त वजनाचा (1528 किग्रॅम) उपग्रह- मोहिमेसाठीचा खर्च 500 कोटी- सर्व प्रकारच्या हवामानात स्पष्ट चित्र घेण्याची क्षमता- हवामानाचा वर्तवणार अचूक अंदाज- नैसर्गिक आपत्तींची सूचना- भारतीय सीमांच्या रक्षणासाठीही मदत

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी