S M L
  • वर्ल्डकप विजयाला आज 1 वर्ष पूर्ण

    आईबीएन लोकमत | Published On: Apr 2, 2012 12:35 PM IST | Updated On: Apr 2, 2012 12:35 PM IST

    02 एप्रिल 2012 2 एप्रिल 2011 भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिन.. याच दिवशी भारतीय टीमने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्ड कपवर दुसर्‍यांदा नाव कोरलं. भारतीय टीमच्या या विश्वविजयाला आज एक वर्ष पूर्ण झालंय. आणि अजूनही वर्ल्ड कप विजयाची ही आठवण ताजी आहे. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असणार्‍या या वर्ल्ड कप विजयाच्या ही खास आठवण... 2 एप्रिल 2011 ला मुंबईच्या वानखेडे मैदानावर इतिहास रचला गेला. भारतीय टीम वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. फायनलमध्ये भारताची गाठ होती ती श्रीलंकेशी. भारतानं सुरुवातही अगदी दमदार केली. पण श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेनं सेंच्युरी करत भारतासमोर आव्हानात्मक स्कोर उभा केला. याला उत्तर देत भारताची सुरुवातही निराशाजनक झाली.. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर झटपट पॅव्हेलिअनमध्ये परतले. पण तिसर्‍या क्रमांकावर आलेल्या गौतम गंभीरनं विजयाचा पाया रचला. गंभीरनं 97 रन्सची लाजवाब खेळी केली. गंभीर आऊट झाल्यावर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं मॅचची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. धोणीने नॉटआऊट 91 रन्स केले. अखेर कुलसेकराच्या बॉलिंगवर सिक्स मारत धोणीने भारताच्या ऐतिहासिक विजयावरही शिक्कामोर्तब केलं. आणि यानंतर होतं तो विजयाचा जल्लोष आणि फक्त जल्लोष..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close