• पोलिसात जाणं म्हणजे घरच्यांचं शत्रू होणं !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 29, 2012 03:21 PM IST | Updated On: Mar 29, 2012 03:21 PM IST

    अलका धुपकर, मुंबई29 मार्चपोलीस हे आपले वर्गशत्रू आहेत अशी भुमिका जाहीर केलेल्या नक्षलवाद्यांनी आता हिंसक मोहीम अधिक तीव्र केलेय. जे आदिवासी तरुण राज्य सरकारच्या पोलीस भरतीसाठी जात आहे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ते टार्गेट करतायत. पोलीस भरतीसाठी गेलेल्यांची हत्या केली जातेय किंवा त्यांच्या कुटुंबाला गाव सोडायला भाग पाडलं जातंय. गडचिरोली जिल्ह्यातला एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त तालुक्यांपैकी एक. आदिवासीच नक्षलवाद्यांना आश्रय देतात म्हणून नक्षलवाद बळावतो, असं सांगतिलं जातं. पण या तालुक्यातला धाडसी तरुण रुपेश गावडे यानं ठरवलं नक्षलवादी बनायचं नाही. स्वत:च्या वडलांची शेती असूनही त्यानं दोनदा पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्याची निवड झाली नाही. पण, स्वत:चं गाव सोडायची वेळ त्यांच्यावरआलेय. गावात दहशत राहिली तर पाठिंबा मिळेल म्हणून दहशत पसरवण्यासाठी नक्षलवादी किती क्रुरपणे वागतायत याचा आँखो देखा हा हाल..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading