S M L
  • नक्षलवादाच्या बुरख्याआड; कैवारी की वैरी !

    Published On: Mar 27, 2012 05:27 PM IST | Updated On: Mar 27, 2012 05:27 PM IST

    नक्षलवाद्यांचा बुरखा ; आसरा घेणार, जिवपण घेणार !अलका धुपकर, गडचिरोली27 मार्चगडचिरोली जिल्ह्यामध्ये 8 तालुके हे नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. आदिवासी नक्षलवाद्यांना आश्रय देतात, असा गैरसमज प्रचलित आहे. पण प्रत्यक्षात, नक्षलवाद्यांना सहकार्य केलं नाही किंवा नक्षलवाद्यांविरोधात कोणतीही कृती केल्याचा साधा संशय जरी आला तरी गरीब आदिवासीला ठार मारण्याची क्रूर मोहीम नक्षलवाद्यांनी हाती घेतली. रेगडी गावामध्ये पोटचा पोरगा गमावलेल्या अशाच एका आईला आम्ही भेटलो..पोलिसांचा खबर्‍या असल्याच्या संशयावरुन महिन्यांपुर्वी नक्षलवाद्यांनी शरदची गोळ्या घालून हत्या केली. पण शरद पोलिसांचा मुखबीर नव्हताच. बंदूक दाखवून त्याचं अपहरण करण्यात आलं, असं त्याच्या आई बाबानी सांगितलं.तरणाबांड शरद आज या जगात नाही नाही, हे पचवणं त्याच्या घरच्यांना आजही जड जातंय. शरदची हत्या झाली तेव्हा शरदची बायको सहा महिन्यांची गरदोर होती. आज त्यांची मुलगी सात महिन्याची झाली. बापाच्या मायेला तर ती पोरकी झाली. पण पूर्णाश्री सारखी मुलं आज इथं नक्षलवादाच्या छायेखाली वाढत आहे. पश्चिम विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात म्हणून त्याच्या समस्या जगासमोर आल्या. पण नक्षलवाद्यांच्या बंदुकीपुढे पूर्व विदर्भातला आदिवासी कास्तकरी मुकेपणाने अन्याय सोसयतोय. सरकारने लाखोंची भरपाई दिली पण उध्वस्त कुटुंबाच्या दु:खाची भरपाई कुणीच करु शकत नाही. - गडचिरोली - 2011-2012 : 42 जणांची हत्या - गोंदिया 2009 ते 2012 : 6 जणांची हत्या - गेल्या 20 वर्षात 412 जणांची हत्या

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close