• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निर्लज्जपणाचा कळस, दीड तास 'तो' विव्हळत होता आणि लोक बघत होते
  • VIDEO : निर्लज्जपणाचा कळस, दीड तास 'तो' विव्हळत होता आणि लोक बघत होते

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 08:22 PM IST | Updated On: May 4, 2019 08:22 PM IST

    औरंगाबाद, 04, मे : औरंगाबादमध्ये बघ्यांच्या निर्लज्जपणामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. औरंगाबादच्या दौलताबाद घाटामध्ये शेळके मामा हॉटेल जवळ झालेल्या अपघातात दोन तरूण तडफडत होते. मात्र, बघ्यांपैकी एकानंही त्यांना मदतीचा हात न देता त्यांचे व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. तब्बल दीड तास या तरुणांना कुठलीही मदत मिळाली नाही. यामध्ये सुमित कवडे याचा मृत्यू झाला. सुमित दीड तास रक्तानं माखलेल्या अवस्थेमध्ये मदत मागत होता. मात्र त्या दीड तासात बघ्यांच्या गर्दीतल्या कुणालाही मदतीचा हात देणं जमलं नाही. त्यामुळे बघ्यांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी