• होम
  • व्हिडिओ
  • ज्योतीकुमारीच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा
  • ज्योतीकुमारीच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 20, 2012 04:40 PM IST | Updated On: Mar 20, 2012 04:40 PM IST

    प्राची कुलकर्णी , पुणे20 मार्चपाच वर्षांपूर्वी झालेल्या ज्योतीकुमारीच्या हत्येतल्या दोषींना शिक्षा झाली. आणि करिअर करणार्‍या, नोकरी करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली. ही घटना केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून प्रातिनिधीक असल्याचं सांगत पुणे सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला.पुण्यात 2007 मध्ये झालेल्या ज्योतीकुमारीच्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्योतीकुमारीवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या हे बीपीओ क्षेत्रात काम करणार्‍या मुलींचं एक प्रातिनिधिक उदाहरण असल्याचं सांगत पुण्यातल्या कोर्टाने हा निकाल दिला. न्यायासाठी 5 वर्षं वाट पाहिलेल्या ज्योतीकुमारीच्या नातेवाईकांनी यावर समाधान व्यक्त केलंय.विप्रो कंपनीत काम करणारी ज्योती 1 नोव्हेंबर 2007च्या दिवशी कामावर जाण्यासाठी कंपनीच्या गाडीत बसली. पण ड्रायव्हर पुरूषोत्तम बोराटे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकडेनं तिला कंपनीऐवजी एका निर्मनुष्य ठिकाणी नेलं आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर कंपनीत येऊन बोराटेने आपली ऑफिसमध्ये येण्याची वेळही आधीची नोंदवून ठेवली. या केसची सुनावणीही इतकीच नाट्यमय होती. कारण आरोपींचा वकील कवसाळे हा बनावट असल्याचं पुढे आलं. नंतर सुमारे पाच वर्ष हा खटला चालला. या निकालामुळे अशा प्रकारच्या घटना थांबतील अशी आशा तर आहेच. पण त्याहीपेक्षा प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणार्‍या महिलांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळालाय हे त्याहून महत्वाचं. पण ज्योतीच्या कुटुंबीयांसाठी अजूनही यापुढची न्यायालयीन लढाई बाकी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading