• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधानांचं वक्तव्य अस्वस्थ करणारं - पवार
  • पंतप्रधानांचं वक्तव्य अस्वस्थ करणारं - पवार

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 20, 2012 03:08 PM IST | Updated On: Mar 20, 2012 03:08 PM IST

    20 मार्चमित्रपक्षांमुळे विकासात अडथळे येतात असं विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काही दिवसांपुर्वी केलं होतं. पंतप्रधानाच्या या विधानावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. गेली सात ते आठ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय पण कधी अडचणी आल्या नाहीत पण कोणताही निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत राष्ट्रवादीने कधी वेगळी भूमिका घेतली नाही असं असतांना पंतप्रधानांचे वक्यव्य वेदना देणारे आहे त्यांचे वक्तव्य अस्वस्थ करणारे आहे अशा शब्दात पवारांनी आपल्या नाराजीचा मार्ग मोकळा केला. तसेच रेल्वे बजेटवरुन तृणमुलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्या पक्षातला अंतर्गत मुद्दा आहे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी प्रत्येक पक्षाला आपली मत असतात अशी प्रतिक्रीया पवारांनी दिली. विशेष म्हणजे शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे सुप्रसिध्दी बिल्डर संजय काकडे यांनी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत असंही जाहीर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी