24 फेब्रुवारीकाँग्रेसच्या पराभूत नगरसेविका निर्मलादेवी सिंह यांनी रागाच्या भरातआपल्याच पक्षाचे माजी नगरसेवक किसन मिस्त्री यांना चप्पल फेकून मारण्याची घटना घडली आहे. मिस्त्री यांनीच आपल्याला पाडण्यासाठी पुढाकार घेतल्याचे निर्मलादेवी यांचं म्हणणं आहे. निर्मलादेवी या एकनाथ गायकवाड गटाच्या मानल्या जातात, तर मेस्त्री यांच्यावर गुरुदास कामत गटाचा शिक्का आहे. पालिका मुख्यालयातील कँटिनमध्ये या दोघा माजी नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर निर्मलादेवींनी मिस्त्रींना चप्पल फेकून मारली. तसेच आझाद मैदान पोलिसांकडे शिवीगाळ करुन विनयभंग केल्याची तक्रारही दाखल केली.