सेलिब्रिटीजची किंमत ठरणार सेलिब्रिटी इंडेक्सवरून

16 डिसेंबर, मुंबईछवि डंगशेअर बाजाराप्रमाणे प्रत्येक सेलिब्रिटीच्या एण्डॉर्समेन्ट मार्केटमध्ये चढउतार होत असतो. आज जे स्टार आहेत, ते उद्या बेकार असतात. यात गल्लत होते ती जाहिरात कंपन्यांची. जेव्हा एखाद्या स्टारची किंमत होते त्याचवेळी योगायोगाने जाहिरात कंपन्या त्या स्टारवर पैसे लावतात. त्यामुळे अनेक जाहिरात कंपन्यांना स्टारची लोकप्रियता कमी झाल्याने नुकसान सहन करावं लागत आहे. असं होऊ नये यासाठी स्टार्सच्या लोकप्रियतेचा एक इंडेक्स केला जाणार आहे. हा सेलिब्रिटी इंडेक्स असणार आहे. या सेलिब्रिटी इंडेक्सवरून प्रेक्षकांची पसंती कोणत्या स्टारला जास्त आहे ते कळू शकणार आहे. याचा फायदा आपसुकच जाहिरात कंपन्यांना होणार आहे. सेलिब्रिटी इंडेक्सची कल्पना सुचली ती टीम इंडियामुळे. टीम इंडियाचा वर्ल्डकपमध्ये दारुण पराभव झाला होता. त्यावेळी ज्याज्या जाहिरात कंपन्यांनी क्रिकेट स्टार्सवर मोठी रक्कम लावली होती त्यांना त्यांना नुकसान सहन करावं लागलं होतं. कंपन्यांना लगेचच दुस-या सेलिब्रिटीजचा शोध घ्यावा लागला होता. आयत्या वेळेस सेलिब्रिटी हे शोधणं जाहिरात कंपन्यांना कठीण गेलं होतं. एकेका स्टारवर कोट्यवधी पैसे लावणार्‍या या कंपन्यांचा बिझनेस एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता या कंपन्या कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यासाठी आता या स्टार्सच्या लोकप्रियतेचा एक इंडेक्स केला जाणार आहे. त्यावरून प्रेक्षकांची पसंती कोणत्या स्टारला जास्त आहे ते कळायला सोपं जाणार आहे. सेलिब्रिटी इंडेक्सबाबत परसेप्ट टॅलेन्ट मॅनेजमेन्ट कंपनीचे सीइओ मनीष पोरवाल सांगतात, " सेलेबट्रॅक नावाच्या या इन्डेक्समध्ये जवळजवळ दीडशे सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे. स्टार्स निवडताना, बजेट, ब्रँडबरोबर स्टारचा फिटनेस आणि त्यांच्या तारखांचाही विचार केला जाणार आहे. याचा फायदा बिझनेस कंपन्यांना होणार आाहे. " हे रिपोर्ट वर्षातून दोनदा रिलीज होतील. या रिपोटर्सची किंमत जवळ जवळ 11 लाख रुपये असेल. पण स्टार्स निवडणा-या कंपन्या ह्या फक्त रॅकिंगच्या जोरावरच्या या रिपोर्टला फारशी काही देणार नाहीत. कारण जाहिरात कंपन्या आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, " असं सॅटकॉमचे एमडी संदीप लखीना यांचं म्हणणं आहे. सेलिब्रिटी इंडेक्स किती चालतोय ते लवकरच कळेल.

  • Share this:

First published: December 16, 2008, 10:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या