• होम
  • व्हिडिओ
  • राज-उद्धव यांनी एकत्र यावं - बाळासाहेब ठाकरे
  • राज-उद्धव यांनी एकत्र यावं - बाळासाहेब ठाकरे

    आईबीएन लोकमत | Published On: Feb 16, 2012 05:48 PM IST | Updated On: Feb 16, 2012 05:48 PM IST

    16 फेब्रुवारीराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. राज सोडून गेला हे घडायला नको हवं होतं. दोघांच्या या भुमिकेमुळे शिवसेनेचं नुकसान होतं नाही तर महाराष्ट्राच होतं आहे असा गौप्यस्फोट बाळासाहेब ठाकरे यांनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत केला. रविवारी बाळासाहेबांची मुलाखत झाली होती. यावेळी बाळासाहेबांनी राज यांना 7 वर्षांनंतर एकत्र येण्याची हाक दिली आहे.18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उभा केला. पण राज यांच्या जाण्याचे बाळासाहेबांना कायम दुख होतं. राज जाताना बोलून सुध्दा गेला नाही. असं खुद्द बाळासाहेबांनी म्हटलं आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने झालेले जाहीर सभेत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन, त्यांनी भेटायला बोलावले तर मी जाईन असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. पण उध्दव ठाकरे दगाबाज आहे त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा पुढे टाकणार असंही ठणकावून सांगितले. पण दोघाभावांच्या वेगळे राहिल्यामुळे बाळासाहेबांना आजही दुख आहे. राज आणि उध्दव यांनी एकत्र यावे, या दोघांच्या वेगळेपणामुळे हे शिवसेनेचे नुकसान नाही तर महाराष्ट्राचे नुकसान होतं आहे. पण हा मराठ्यांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांना जिजामाताचे सख्ये बंधू यांना मुसक्या बांधून तुरुंगाच टाकावे लागले होते. मग हा कोण आहे ? हा स्वत:ला जिजामातेचा भाऊ समजतो का ? राज यांने बाहेर पडणं हे घडायला नको होते. आता त्यांनी एकत्र यावे पण त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यावे त्यांना स्वातंत्र्य आहे असंही बाळासाहेब म्हणाले. तसेच उध्दव-राज यांच्या भांडणावर बाळासाहेबांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. मी राज ठाकरेंशी याबद्दल बोलू शकतो पण उध्दव यांना समजवू शकत नाही. एक घरात पडलेले दोन मार्ग एक झाले तर ही गोष्ट चांगली आहे असं मतही पवार यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं होतं.आता राज आणि उध्दव ठाकरे काय भुमिका घेता याकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close