चिकन,अंडी खाणं होणार महाग, लवकरच नवे नियम लागू

चिकन,अंडी खाणं होणार महाग, लवकरच नवे नियम लागू

चिकन, अंडी खायला तुम्हाला आवडत असतील, नेहमीच्या जेवणात तुम्ही त्याचा समावेश करत असाल तर तुमचा खर्च आता वाढणार आहे.

  • Share this:

मुंबई, 03 मे : चिकन, अंडी खायला तुम्हाला आवडत असतील, नेहमीच्या जेवणात तुम्ही त्याचा समावेश करत असाल तर तुमचा खर्च आता वाढणार आहे. कारण सरकार कुक्कुटपालनासाठी नवे नियम लागू करणार आहे. आता कुक्कुटपालन पशू क्रूरता अधिनियमाखाली येणार आहे. सरकारनं हे नियम ड्राफ्ट केलेत. स्टेकहोल्डर्सना याबद्दल आपापली मतं, शिफारसी, सूचना द्यायला सांगितलंय.

तुमच्या खिशात आहे सोन्याची खाण, कशी ते घ्या जाणून

सरकारद्वारे हे नवे नियम 1 जानेवारी 2020मध्ये लागू होतील. या नियमांतर्गंत सर्व कुक्कुटपालन करणाऱ्यांना रजिस्ट्रेशन करणं आवश्यक राहील. नियम तोडला तर दंड द्यावा लागेल.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 20 वर्षापूर्वीचा 'हा' नियम बदलला

कुक्कुटपालनाचं होणार रजिस्ट्रेशन

या नियमांप्रमाणे रजिस्ट्रेशनच्या वेळी पूर्ण माहिती द्यावी लागेल. दर वेळी सरकार फार्मचं निरीक्षण करेल. त्यानंतर 6 ते 8 कोंबड्यांसाठी 550 चौरस सेंटिमीटर जागा ठेवायला हवी. कोंबड्यांसाठी डाॅक्टर नियुक्त करावे लागतील. अँटिबायोटिक्स डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार द्याव्या लागतील. याचं रेकाॅर्डही ठेवावं लागेल.

शहीद तौसिफ शेख यांना अखेरचा निरोप, पापाss पापाss म्हणत दीड वर्षीय जहेदचा आक्रोश

अंड्याच्या उत्पादनात भारत दुसऱ्या नंबरवर

या नियमांचं पालन नाही केलं तर दंड बसू शकतो. एकूणच हे नियम पाळल्यामुळे अंडी, चिकन महाग होणार. भारत अंड उत्पादनात जगभरात दुसऱ्या नंबरवर आहे. दर वर्षी भारतात 880 कोटी अंड्यांचं उत्पादन होतं. तर 42 लाख टन बाॅयलर कोंबड्यांच्या मांसाचं उत्पादन होतं.

VIDEO: बुरहान वाणीच्या साथीदाराचा खात्मा, चकमकीचा EXCLUSIVE VIDEO

First published: May 3, 2019, 5:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading