• होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे टाकायला तयार - राज
  • बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे टाकायला तयार - राज

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 13, 2012 06:25 PM IST | Updated On: Feb 13, 2012 06:25 PM IST

    13 फेब्रुवारीबाळासाहेब तुमच्यासाठी मी शंभर पावलं टाकेल पण उध्दव आणि इतर टाळक्यांसाठी एक पाऊल ही टाकणार नाही माझ्यासाठी जसे मातोश्रीचे दार उघडे आहे तसेच माझ्याही घरचे दार उघडे आहे असं जाहीर आव्हान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिले. उध्दव आणि त्यांच्या टाळक्यांनी सगळ्या राज्यासह महापालिकेचा विचका करुन टाकला आहे यासाठी मी पाऊल टाकणार नाही, भ्रष्टाचार, घोटाळे केले, पैसे खाल्ले यासाठी मी पाऊल टाकणार नाही असंही राज यांनी ठणकावून सांगत राज यांनी पालिकेच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला. रविवारी बाळासाहेब ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली होती. यामध्ये राज यांना आम्ही बाहेर काढले नाही तोच गेला असा खुलासा बाळासाहेबांनी केला होता. राज यांनी यांचं खुलाश्याचा धागा पकडत काय घडले त्या दिवशीचा पाढाच वाचून दाखवला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांची अखेर 13 तारखेची सभा मुंबईतील जांबोरी मैदानावर पार पडली. यावेळी याच दिवशी मला पहिली अटक झाली होती आणि नंतर जामीन ही झाली होती याची आठवण राज यांनी केली. यानंतर राज यांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला. बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत नक्कला काय करतो, मर्दासारखा लढून दाखवं असा टोला लगावला होता. यावर राज म्हणतात, मी मर्दासारखाच लढत आहे पण शिवसेनेचे काही पदाधिकारी सभा सुरु असताना केबल बंद करतात, पेपरात मुलाखत आली म्हणून पेपराचे गठ्ठे पळवून लावतात अगोदर त्यांना सांगा माझ्यासोबत मर्दासारखे लढा असं प्रतिउत्तर राज यांनी दिले. मी शिवसेनेत असताना कधी असे झाले नाही काय हे असेल प्रकार जर हिंमत असेल तर अगोदर त्यांनी मर्दासारखे लढून दाखवावे असा टोला लगावला. तसेच बाळासाहेबांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मुलाखत घेतली. यामुलाखतीत आम्ही राज ला शिवसेनेतून बाहेर काढले नाही तोच बाहेर पडला. ज्यावेळेस त्याला बाहेर पडायचे होते तेव्हा तो माझ्याकडे आला मला नाशिक पाहिजे,पुणे पाहिजे अशी मागणी केली. आम्ही दिली पण परत आला आणि आता मुंबई द्या मग मला याची खरी भानगड कळाली. मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला आहे ती देणे शक्य नाही. पण तो बाहेर पडला आणि जाताना बोलून सुध्दा गेला नाही याचे दुख आम्हाला आहे असं बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांच्या खुलासा पकडून राज यांनी त्या दिवशी काय घडले हे स्पष्टपणे सांगून टाकले. मी शिवसेनेशी 2001 ते 2003 मध्ये पूर्णपणे बाजूला होतो. प्रचार आला की मला भाषणाला बोलवले जात होते. पण त्या दोन वर्षात मला कधीच विचारले गेले नाही. फक्त प्रचारापुरता विचारत होते. मला कोणतेच अधिकार नव्हते. कोणताही अधिकारी नेमण्याचा साधा अधिकार मला नव्हता. मला नाशिक दिलं मी तिथे कारभार पाहिला. जिथे काँग्रेसचा प्रभाव आहे ती जागा मला द्या तिथे मी दगडातून पिकं काढून दाखवतो. पण मी कधी मुंबई मागितली नाही. मला वेदना होती, दुख होतं. त्यादिवशी मनोहर जोशी यांनी माझी समजूत काढली. बाळासाहेबांकडे घेऊन गेले. आणि त्याच दिवशी माझा विश्वास उठला. बाळासाहेब म्हणाले, तुला जबाबदारी हवी आहे ना तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग घे, त्यावेळी नारायण राणे बाहेर पडाले होते. मला तिथे राणे विरुध्द उभ केलं जातं होतं. मला शिवसेना सोडण्याची इच्छा नव्हती पण चार पाच काटर्‌यांसाठी मला बाहेर पडावे लागले. आणि आज हीच महाराष्ट्राची जनता मला पाठिंबा देत आहे हे लक्षात आले नाही का ? गेल्या कित्येक वर्षात सेनेचे आकडा खाली घसरला आहे त्यांना कधी जाब विचारायला नको का ? बाळासाहेब माझ्यासाठी सन्मानिय आहे त्यांच्यासाठी मी शंभर पावलं पुढे टाकेल. कधीही बाळासाहेबांसाठी पाऊल टाकेल पण उध्दव ठाकरे आणि त्या चार पाच टाळक्यांसाठी एक पाऊल सुध्दा टाकणार नाही. जसे माझ्यासाठी मातोश्रीचे दार उघडं आहे तसेच माझ्या घरचं दार ही बाळासाहेबांसाठी उघडं आहे असं जाहीर आव्हान राज यांनी दिले. तसेच यांच्यासाठी काय म्हणून पाऊल टाकायचे ? ज्या महापालिकेत गेल्या 17 वर्षापासून सत्ता आहे. काय करुन दाखवलं ? या पालिकेत नुसते घोटाळे, पैसे खाण्याचे धंदे केले. सगळ्या शहराचा विचका करुन दाखवला आहे. या पाच वर्षाचा पालिकेचं बजेट होतं 21 हजार कोटी रुपये इतका एवढं बजेट 13 राज्यांचे सुध्दा नाही. यातून 60 टक्के हे अधिकार्‍यांच्या, कर्मचार्‍यांच्या पगारांवर खर्च झाले. बर ते ठिक आहे पण यातून उरले किती 40 टक्के म्हणजे 40 हजार कोटी आता हे गेले कुठे ? यांच्याच कंत्राटांच्या, पदाधिकार्‍यांच्या खिश्यात गेले. तिकडे त्या जैतापूर प्रकल्पाला विरोध केला. आता कुठे आहे ते आंदोलन ? या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात एकाचा बळी गेला. तेव्हा उध्दव ठाकरे हे कान्हा जंगलात फिरायला गेले पण जैतापूरमध्ये फिरकले सुध्दा नाही. नुसती आंदोलन करायची विरोधाला विरोध का म्हणून करायचा अशा घणाघाती टोला राज यांनी लगावला. त्याचबरोबर पुन्हा पालिकेच्या गैरकारभाराचा पाढाच राज यांनी पुराव्यानिशी वाचून दाखवला. मुंबईत जे स्विमिंग पूल हे ब्रिटीशांनी 1930 साली बांधले यांचा नुतनीकरण करण्याचं टेंडर काढले 42 कोटींचे होते. पण ते निघेपर्यंत झाले 52 कोटी रुपयांचे कोणता हा कारभार म्हणावा ? आणि तिकडे संयुक्त मराठी भवन बांधले यासाठी 10 कोटी हे जिजामाता उद्यानाचे 10 कोटी फिरवले आहे असा आरोप ही राज यांनी पुन्हा केला. यावर खर्च किती केला. विद्युत कामासाठी 1 कोटी 62 लाख, अग्निशमन 15 लाख, सीसीटिव्ही 10 लाख 80 हजार तसेच बाहेर जे कलाकुसर केले आहे त्यासाठी 3 कोटी 13 लाख खर्च केले आहे. कोणताहा कारभार म्हणावा. तिकडे शाळतेली मुलांसाठी सुगंधित दूध योजनेत 298 कोटी खर्च केले आणि दूध कुठून मागवले तर ते दिल्लीतून. यांना राज्यातील दूध सहकारी संस्था भेटल्या नाही का ? यासाठी मी पाऊल टाकू का ? असा संतप्त सवाल राज यांनी विचारला. ज्या वांद्रे रेल्वेस्टेशन लगतच्या बेहमपाड्याच अनाधिकृत झोपडपट्‌ट्यात सात-सात मजली उभ्याराहिल्या आहे हे उध्दव यांना दिसत नाही का ? मुंबईत एकेकाळी धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी होती आता तश्या 4 झोपडपट्या झाल्या आहे. काय ही लोक झोपा काढत होती का ? यासाठी मी पाऊल टाकू का ? बाळासाहेबांचे प्रेम मी स्विकारतो त्यांच्यासाठी मी शंभर पाऊलं टाकतो पण यांच्यासाठी एक पाऊल टाकणार नाही. खळ्ळ फट्याकची भाषा माझ्याकडे पण आहे. ती वेळेवर दाखवत आलोच पण यांना अशा सत्ताधार्‍यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी एकदा सत्ता हातात द्या, असं आवाहन ही राज ठाकरे यांनी केलं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading