राष्ट्रवादीची आज बैठक, विधानसभेसाठी 'हा' आहे शरद पवारांचा मास्टरप्लॅन

राष्ट्रवादीची आज बैठक, विधानसभेसाठी 'हा' आहे शरद पवारांचा मास्टरप्लॅन

आगामी विधानसभा निवडणुकीत दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लगेचंच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी ही अत्यंत महत्त्वाच्या बैठक असणार आहे. कारण या बैठकीत आमदार, खासदारांकडून त्यांच्या भागातील दुष्काळाची माहिती घेण्यात येणार आहे. तसंच दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी काय करता येईल, याबाबतही विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत दुष्काळ आणि शेतकऱ्यांचे इतर प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे या मुद्द्यारून सरकारला लक्ष्य करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. दुष्काळाच्या प्रश्नावरून राज्यातील फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीकडून या बैठकीत मोर्चेबांधणी केली जाऊ शकते.

दरम्यान, शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकसभेसाठीचं मतदान संपताच सोलापुरातील सांगोला इथं भेट दिली. यावेळी त्यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यलमार मांगेवाडीतल्या ग्रामस्थांनी यावेळी जनावरांचं दूध किती घटलंय याची आकडेवारीच सांगितली.

या गावातलं दूध संकलन दुष्काळामुळे 2 हजार लिटरवरुन थेट 200 लिटरवर आलं आहे. त्यात सध्या दुष्काळी चारा छावण्यांमध्ये एका कुटुंबातल्या फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश दिला जात आहे. ही अट काढून टाकावी, तसंच पंधरा किलोपेक्षा जास्त चारा मिळावा, अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी पवारांकडे केल्या आहे.

VIDEO : 'बाबा...' शहीद जवानाच्या दीड वर्षीय मुलाचा आक्रोश, उपस्थितांचे डोळे पाणावले

First published: May 3, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading