• होम
  • व्हिडिओ
  • कौल मुंबईचा : मनसेच्या हाती असेल सत्तेची चावी ?
  • कौल मुंबईचा : मनसेच्या हाती असेल सत्तेची चावी ?

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 7, 2012 05:59 PM IST | Updated On: Feb 7, 2012 05:59 PM IST

    06 फेब्रुवारीमहापालिकांच्या निवडणुकीचा रंणधुमाळीना आता रंग चढू लागला आहे. यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार अशी स्पष्ट चिन्ह निर्माण झाली आहे. पण सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात असणार आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनात काय सुरु आहे त्याचा मागोवा आयबीएन लोकमतने घेतला. आयबीएन लोकमत आणि जीएफके मोड सर्व्हेत लोकांनी आपली मनातला पक्ष,नेता बोलून दाखवला आहे. यासाठी आम्ही काही उपनगरात याचा सर्व्हे केला. या सर्व्हेचा कालावधी : डिसेंबर 2011 ते जानेवारी 2012 असा आहे. एकूण 3,724 मतदारांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. त्यात 55% पुरुष आणि 45% महिलांचा समावेश आहे. मराठी भाषिक - 45 हिंदी 37 ,गुजराती 8% इतर भाषिक - 10 टक्के लोकांचा सहभाग होता. तर आयबीएन-लोकमतच्या या सर्व्हेवरुन मुंबई महापालिकेच्या सत्तेची चावी मनसेच्या हाती राहू शकते, अशी शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.आयबीएन लोकमत आणि जीएफके मोड सर्व्हेतील प्रश्न ?1. मुंबईच्या बकाल अवस्थेचं प्रमुख कारण काय?* भ्रष्ट नगरसेवक- 72 %* लोकसहभागाचा अभाव- 49%* नागरी कर्तव्याचा अभाव- 37%* केंद्र आणि राज्याकडून पुरेसा निधी नाही-30%* शहरातील परप्रांतीय- 11%2. महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपसाठी अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे का?होय- 84%नाही- 16%3. या निवडणुकीत मनसेमुळे शिवसेना-भाजपला फटका बसेल का?होय- 62%नाही- 38%4. मनसेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसेल का?होय- 49%नाही- 51%मुंबई*1. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवारांसाठी महापालिका निवडणूक राजकीय भवितव्य ठरवणारी आहे का?होय- 83 %नाही- 17%5. महानगरातील नागरिकांच्या समस्या कोणता नेता अधिक न्याय देऊ शकेल?राज ठाकरे- 37 %उद्धव ठाकरे- 19%पृथ्वीराज चव्हाण-10%अजित पवार- 09 %नितीन गडकरी- 06%

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading