पैसे दुप्पट करणारी अधिकृत योजना, सुरू करा फक्त 1000 रुपयांनी

पैसे दुप्पट करणारी अधिकृत योजना, सुरू करा फक्त 1000 रुपयांनी

यावरचा व्याज दर वेळेनुसार बदलत जातो. यात तुम्ही 50 हजार रुपये गुंतवाल तर एक लाख रुपये रिटर्न मिळतील.

  • Share this:

मुंबई, 03 मे : तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर पोस्ट आॅफिसच्या एका योजनेचा चांगला पर्याय आहे. ही योजना आहे किसान विकास पत्र (KVP ). तुम्ही याची सुरुवात फक्त 1 हजार रुपयांनी करू शकता. ही योजना 118 महिन्यांनी तुमची गुंतवणूक डबल करते. किसान विकास पत्र कुणीही खरेदी करू शकतं. यावरचा व्याज दर वेळेनुसार बदलत जातो. यात तुम्ही 50 हजार रुपये गुंतवाल तर एक लाख रुपये रिटर्न मिळतील.

जलद होतात पैसे दुप्पट - या योजनेत एक हजार रुपयांपासून तुम्ही पैसे गुंतवू शकता. म्हणजे दोन हजार, तीन हजार किंवा अजून कुठली रक्कम. पण सगळे पैसे तुम्हाला एकदाच भरावे लागतात. म्हणजे यात दर वर्षी पैसे गुंतवण्याची सोय नाही. समजा तुम्हाला एक लाखाचे दोन लाख करायचेत, तर तुम्हाला पूर्ण एक लाख या योजनेत गुंतवावे लागतील. मग 9 वर्ष, 10 महिन्यानंतर ते 2 लाख रुपये होतील. पोस्ट आॅफिसकडून तुम्हाला पासबुकही मिळू शकतं.

बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ, नवी आकडेवारी जाहीर

जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

काय आहे किसान विकास पत्र? - हे एक प्रमाणपत्र आहे. ते कुणीही खरेदी करू शकतं. यावर व्याज मिळतं. हे व्याजदर बदलत असतात. देशातल्या कुठल्याही पोस्ट आॅफिसमधून तुम्ही किसान विकास पत्र घेऊ शकता. 1 आॅक्टोबर 2018पासून यावर 7.7 टक्के व्याजदर मिळतोय.

किती पैसे गुंतवू शकता? - यात तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकता. पण गुंतवणूक हजाराच्या घरातच हवी. म्हणजे 1500 रुपये, 2500 रुपये असं चालणार नाही. गुंतवणूक एक हजार, दोन हजार, तीन हजार अशीच हवी.

Pan Card साठी अर्ज करताना 'या' चुका करू नका

कोण खरेदी करू शकतं? -देशभरातल्या कुठल्याही पोस्टातून खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या मायनर अपत्यासाठीही खरेदी करू शकता. 2 लोकांच्या नावावर हे खरेदी करता येतं.

किती वेळानं पैसे काढू शकता? - तुम्ही कमीत कमी अडीच वर्षांनी पैसे काढू शकता. पण आर्थिक तज्ज्ञांच्या मते ही गुंतवणूक जास्त काळासाठी करावी.

कधी होतात पैसे दुप्पट? - किसान विकास पत्रात पैसे गुंतवलेत तर सध्याच्या 7.7 टक्के व्याजाच्या हिशेबानं 9 वर्ष 10 महिन्यांनी पैसे डबल होतील.

पाणी फाउंडेशन उपक्रमादरम्यान हिंसा, श्रमदान करणाऱ्यांवर आदिवासींचा हल्ला

कुठली कागदपत्र लागतील? - 2 पासपोर्ट साइज फोटो, ओळखपत्र ( रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र, पासपोर्ट ), घराचं प्रमाण पत्र ( विजेचं बिल, टेलिफेन बिल, बँक पासबुक ). तुमची गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे.

काय सुविधा मिळते? - या योजनेत तुम्ही नाॅमिनेशन करू शकता. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करता येतं. देशातल्या काही बँकांकडून तुम्ही किसान विकास पत्र आॅनलाइन घेऊ शकता.

कर सुविधा मिळते - बँक बाजार डाॅट काॅमच्या वेबसाइटच्या मते किसान विकास पत्रावर कर सवलत मिळते. मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या पैशांवर टीडीएस लागत नाही.

VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'

First published: May 3, 2019, 12:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading