विजयाचा हिरो ठरला वीरेंद्र सेहवाग

विजयाचा हिरो ठरला वीरेंद्र सेहवाग

15 डिसेंबर चेन्नईचेन्नई टेस्टच्या विजयाचा हिरो ठरला तो वीरेंद्र सेहवाग. आपल्या धडाकेबाज खेळीनं सेहवागनं या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला. त्यानं गौतम गंभीरबरोबर शतकी पार्टनरशिप करत इंग्लंडच्या बॉलर्सवर दबाव आणला. 311 रन्सवर नववी विकेट गेल्यावर इंग्लंडचा कॅप्टन केविन पीटरसनने मोठ्या आत्मविश्वासानं दुसरी इनिंग घोषित केली होती. भारतासमोर विजयासाठी एकूण 387 रन्सचं आव्हान त्यानं ठेवलं होतं.टेस्टच्या पहिल्या दिवसापासून पीटरसनचे सगळे निर्णय अचूक ठरले होते. त्याची कप्तानी नियोजनबद्ध होती. पण विरेंद्र सेहवागचा धडाका सुरू झाला तर त्याला कसं सामोरं जायचं याचं उत्तर मात्र पीटरसनकडे नव्हतं. तसंही फॉर्मात आलेल्या सेहवागला रोखायचं कसं याचं उत्तर कोणत्याही कॅप्टनकडे नसेल. चेन्नईतही नेमकं तेच घडलं. 102 मिनिटं सेहवाग पीचवर होता.आणि तेवढ्या वेळात त्याने खेळाचा नूरच पालटला.चार खणखणीत सिक्स आणि अकरा फोरची बरसात केली.बघता बघता भारतीय टीमची सेंच्युरी बोर्डवर लागली.या टेस्टचा निकाल लागू शकतो आणि तोही भारताच्या बाजूने हा विश्वास सेहवागने टीमला दिला. स्वत: सेहवाग 83 रन्सवर आऊट झाला.त्याची सेंच्युरी हुकली.पण या इनिंगमध्ये त्याने दोन रेकॉर्ड मोडले. भारतातर्फे सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड यापूर्वी कपिल देवच्या नावावर होता. पण सेहवागने आता एकूण 64 सिक्स ठोकत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याशिवाय जलद हाफ सेंच्युरीच्या यादीत भारतात सेहवाग आता दुस-या स्थानावर पोहोचला. इथंही कपिल देवाचा जुना रेकॉर्ड त्यानं मोडला. सेहवागच्या ह्या खेळीमुळेच मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

  • Share this:

First published: December 15, 2008, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या