• लवकरच भरणार सिनेमागृहात 'शाळा'

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jan 11, 2012 02:43 PM IST | Updated On: Jan 11, 2012 02:43 PM IST

    गोपाल मोटघरे, पुणे 11 जानेवारीमलिंद बोकिलांच्या सुप्रसिध्द कादंबरीवर आधारित असलेल्या शाळा हा सिनेमा येत्या 20 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाळा सिनेमाची कलाकार मंडळी पुण्यात एकत्र जमली होती. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाच्या असणार्‍या शाळेवर बेतलेला हा सिनेमा.. शाळा कादंबरीबर आधारित असणार्‍या या सिनेमाचं दिग्दर्शन सुजय डहाकेने केलं आहे. या कलाकांबरोबरच शाळा कादंबरीचे लेखक मिलिंद बोकील हे सुध्दा यावेळी उपस्थित होते.कादंबरीतील शब्दनशब्द पडद्यावर उतरल्याचा आनंद त्यांना या सिनेमातून झाला. संतोश जुवेकर, अमृता खानविलकर अशी मोठ्या कलाकारांची फौजही या सिनेमात आहे. एका उत्तम कलाकृतीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचं दोघांचही मत आहे. मुळात गायक असलेली केतकी माटेगावकर या चित्रपटात पिहल्यादाच बाल अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा सिनेमातील वेगळा लूक तिला चांगलाच भावला आहे. तर ही शाळा 20 जानेवारीला सुरू होणार आहे तेव्हा रसिकांनी या शाळेत प्रवेश घ्यायला हरकत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी