भारताने चेन्नई टेस्ट जिंकली

भारताने चेन्नई टेस्ट जिंकली

15 डिसेंबर चेन्नईभारताने चेन्नई टेस्ट मॅच 6 विकेटने जिंकली. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी 387 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. विजयासाठी आवश्यक रन्सचा पाठलाग करताना भारताची ओपनिंग पार्टनरशिप चांगली झाली. टेस्टच्या शेवटच्या दिवशी द्रविड आणि गंभीर लवकर आऊट झाल्यामुळे मॅचचं पारडं इंग्लडच्या बाजूनं झुकलं होतं. पण सचिनने संयमी खेळ करत इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले. लक्ष्मण आणि युवराज सिंगने त्याला चांगली साथ दिली. सेहवाग पाठोपाठ गंभीर, सचिन आणि युवराजनंही हाफ सेंच्युरी ठोकत विजय भारताच्या अवाक्यात आणला. भारतातर्फे सेहवागने 83, गंभीर66, द्रविड 4 आणि लक्ष्मणने 26रन्स केले.99 रन्सवर असताना सचिनने फोर मारून आपली 41वी सेंच्युरी पूर्ण केली.आणि भारताला विजयी लक्ष्यही गाठून दिलं. सचिन 103 आणि युवराज सिंग 85 रन्सकरून नॉट आऊट राहिले.भारताने 4 विकेटवर 387 रन्सकरून इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट जिंकली. अशाप्रकारे इंग्लंडविरुद्धच्या 2 टेस्ट सीरिजमध्ये चेन्नई टेस्ट जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मॅन ऑफ द मॅच विरेंद्र सेहवागला देण्यात आलं. इंग्लंड पहिली इनिंग 316/10भारत पहिली इनिंग 241/10इंग्लंड दुसरी इनिंग 311/9 डाव घोषितभारत दुसरी इनिंग 387/4

  • Share this:

First published: December 15, 2008, 10:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या