15 डिसेंबर'नेटवर्क 18'चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि संस्थापक राघव बहल यांना ऍमिटी विद्यापीठाकडून 'मानद डॉक्टरेट' पदवी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल बद्दल बहल यांना ही पदवी जाहीर झाली. नेटवर्क 18 माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट आणि सिनेमाच्या क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या माध्यमातून राघव बहल यांनी नेटवर्क 18 या कंपनीचा विकास केला. त्यांच्यासोबतच भाजप नेते अरुण जेटली आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनाही मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे.