09 नोव्हेंबरसंसदेनं ठराव पास करुनही लोकपाल विधेयकावरील अहवालात हव्या त्या तरतुदी केली नसल्याबाबत अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.हा संसदेचा आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अवमान असल्याची जळजळीत टीका अण्णांनी केली. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळेयांनी अण्णांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अण्णांनी टीका केली. तसेच जनलोकपाल विधेयक नाही आलं तर आगामी पाच राज्यांच्या विधानसभा तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात प्रचार करणार, असा थेट इशारा अण्णांनी दिला. नागरिकांची सनद, लोकायुक्त आणि कनिष्ठ कर्मचारी या मुद्द्यांवर तडजोड नाही, असंही अण्णांनी स्पष्ट केलं.