परस्पर हितसंबंधांच्या आरोपांवरून लक्ष्मणची सटकली, म्हणाला...

परस्पर हितसंबंधांच्या आरोपांवरून लक्ष्मणची सटकली, म्हणाला...

2015 साली क्रिकेट सल्लागार समितीचं गठन केलं. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश करण्यात आला.

  • Share this:

हैदराबाद, 01 मे: स्वभावानं शांत आणि क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक अशी ओळख असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मण आता मात्र चांगलाच संतापला आहे. कारणही तसंच काहीसं आहे. लक्ष्मणवर परस्पर हितसंबंध जपल्याचा आरोप करण्यात आला होता.

लक्ष्मण बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आणि आयपीएलमध्ये हैदराबादच्या टीमचा सल्लागार आहे. त्यामुळं लोकपाल डी.के.जैन यांच्याकडे लक्ष्मणच्या परस्पर हितसंबंधांची तक्रार करण्यात आल्यानंतर, जैन यांनी लक्ष्मणकडे याबाबत विचारणा केली होती. यावर लक्ष्मणनं, ''केवळ क्रिकेटची सेवा करण्यासाठी मी बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा भाग झालो आणि पदभार स्वीकारला. त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या परस्पर हितसंबंधांमध्ये सामील व्हायची माझी इच्छा नव्हती'', असे स्पष्ट मत आपल्या पत्रात व्यक्त केले. तसेच, माझा हेतू केवळ माझ्या अनुभवातून क्रिकेटला पुढे घेऊन जाणे होता. पण माझ्या हेतूविषयी शंका उपस्थित होत असतील, तर मला अशा स्थितीमध्ये पडायचं नाही, असं या पत्रात लक्ष्मणने लिहिलं आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी त्यांच्या कार्यकाळात 2015 साली क्रिकेट सल्लागार समितीचं गठन केलं. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश करण्यात आला.

दरम्यान यावेळी, लक्ष्मणनं सर्वोच्च न्यायालयाच्या बीसीसीआयनं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीवरही टीका केली. लक्ष्मणनं आपल्या पत्रात प्रशासकीय समितीसोबत ताळमेळ नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, 7 डिसेंबर 2018 रोजी आम्ही प्रशासकीय समितीला पत्र लिहिलं आणि आमची जबाबदारी नेमकी काय आहे? याबाबत स्पष्टीकरण मागितलं. याबद्दल अजूनही उत्तर मिळालं नसल्याचा दावा लक्ष्मणनं केला आहे. दरम्यान याआधी सौरव गांगुलीवरही असाच आरोप करण्याता आला होता. गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असून तो, दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे.

याबाबत सचिन तेंडुलकरवरही आरोप करण्यात आला होता. यावर सचिननं आपण मुंबई इंडियन्स संघाकडून कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नसल्याची कबुली दिली होती. तरीही याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

VIDEO : जेव्हा अमेरिकन झाले 'आर्ची' आणि 'माऊली', महाराष्ट्र दिनाच्या अशाही शुभेच्छा

First published: May 1, 2019, 7:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading