• कॉम्प्युटर ऑपरेटर बनला करोडपती

    आईबीएन लोकमत | Published On: Nov 2, 2011 02:13 PM IST | Updated On: Nov 2, 2011 02:13 PM IST

    02 ऑक्टोबरबिहारमधील रहिवासी कॉम्प्युटर ऑपरेटर सुशीलकुमार हा यंदाच्या 'कौन बनेगा करोडपती' च्या पाचव्या पर्वातील करोडपती ठरला आहेत. या पर्वात त्याने तब्बल 5 करोड रूपये जिंकले आहेत. अमिताभ बच्चना यांनी विचारलेल्या 13 पैकी 13 प्रश्नांची अचूक उत्तरं सुशीलकुमार याने दिली आणि तो या पर्वातला पहिला करोडपती ठरला. सुशील कुमार बिहारमधील मनेहर गावचा रहिवासी असून तो कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. यावेळी सर्वात प्रथम त्यांने आयबीएन नेटवर्ककडे प्रतिक्रिया दिली सुशील कुमार म्हणतो की, मी अजूनही स्वप्नात आहे असं मला वाटतं आहे. 'कौन बनेगा करोडपती' जेव्हा सुरू झालं होतं. त्यावेळी माझ्याकडे फोन तर दुरची गोष्ट माझ्या घरी टी.व्ही सुध्दा नव्हता. तेव्हा तो शेजार्‍यांकडे बघायचो आणि जे जे प्रश्न विचारले जात होते त्यांची मी उत्तर देत होतो. मग विचार आला की, आपणही यात भाग घ्याला हवा. जेव्हा मला नोकरी लागली तेव्हा मी सीझन 4 मध्ये भाग घेतला पण काही झालं नाही. म्हणून मी पुन्हा 'केबीसी सीझन 5' मध्ये भाग घेतला आणि मी विजयी झालो. या विजयाच श्रेय माझ्या घरच्याना देतो. मी या पैशातून जे गरजु मुले आहेत त्यांना शिक्षण देणार आहे. मी माझ कर्तव्य आणि भाग्य हे एकमेकांशी जुळलेल आहे अस मला वाटते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close