वारणानगरमध्ये जागतिक कुस्ती स्पर्धा सुरू

14 डिसेंबर कोल्हापूर.प्रताप नाईकसहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 14 पुण्यस्मरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथे जागतिक मल्लयुद्ध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जॉर्जिया, इराण आणि भारताच्या मल्लांनी भाग घेतला होता. कोल्हापूर म्हटलं की कुस्ती आलीचं. कुस्ती रसिकांना वेड लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं यंदाही स्वर्गीय तात्यासाहेब कोरे जागतिक मल्लयुद्ध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जॉर्जिया, इराण आणि भारताच्या मल्लांनी भाग घेतला. या स्पर्धेचं खास आकर्षण होता तो बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीत ब्राँझ मेडल मिळवून देणारा सुशील कुमार.पण सुशील कुमारपेक्षाही या ठिकाणी सगळ्यांचं सर्वात जास्त लक्ष वेधलं ते या स्पर्धेच्या निवेदकांनी. वारणानगर इथे राहणा-या ईश्‍वरा पाटलांनी कुस्तीसाठी आपलं आयुष्य वेचलं. 14 वर्ष फड गाजवल्यानंतर ते कुस्त्यांच्या स्पर्धेत निवेदन करू लागले. प्रत्येक स्पर्धेत पाटील सलग 10 ते 12 तास अखंड निवेदन करतात. आणि त्यांच्या या निवेदनाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटकातील कुस्ती रसिकही गेली 14 वर्ष भरभरून दाद देतात.

  • Share this:

First published: December 14, 2008, 10:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या