• कसं घडलं 'कॅश फॉर वोट' प्रकरण

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Sep 6, 2011 02:15 PM IST | Updated On: Sep 6, 2011 02:15 PM IST

    06 सप्टेंबरलोकशाहीला काळीमा फासणारा कॅश फॉर वोटचा हा प्रकार 2008 मध्ये घडला होता. समाजवादी पक्षाचे त्यावेळचे सरचिटणीस अमरसिंग यांचे एक सहकारी भाजपच्या खासदारांना लाच देताना आयबीएन-नेटवर्कने रंगेहाथ पकडलं होतं. पण ते प्रसिद्ध न करता आयबीएन-नेटवर्कने या प्रकरणाची सीडी लोकसभेचे त्यावेळचे अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्याकडे सोपवली होती.विश्वासदर्शक ठरावाच्या आदल्या दिवशीच्या संध्याकाळी आयबीएन-नेटवर्कच्या टीमने तीन खासदारांची भाजपचे खासदार अशोक अर्गल यांच्या दिल्लीतल्या घरी भेट घेतली. सोहेल नावाच्या व्यक्तीने हे तीन खासदार आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यादरम्यान भेट घडवून आणली होती. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास समाजवादी पक्षाचे खासदार रेवती रमण सिंग त्याठिकाणी आले."रेवती रमण सिंह - क्या बात है बताओमहावीर सिंह - अमाऊंट की तो बात नही हुई होगीरेवती रमण सिंह - अमाऊंट की तो हमने बात नही की है. अमाऊंट की तो आपके सामने बात होगी. अगर आपको बात करना हे तो करो, नही तो अपने घर जाओ. हम क्या जाने आप. फग्गन सिंह कुलस्ते - रेवती रमणजी आये यहाँ और उनसे बातचीत हुई, और उन्होंने रातमें ही कहा चलिए अमरसिंग जी के पास चलते हैं, आमनेसामने बात होगी. "विश्वासदर्शक ठराव जिंकण्याच्या दृष्टीने रेवती रमण सिंह यांनी या डीलसाठी पुढाकार घेतला बोलणी करण्यासाठी अमर सिंग यांच्या घरी चालण्याचा प्रस्ताव सादर केल्याचा दावा भाजपचे खासदार करत आहे. पण रेवती रमण सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तर या खासदारांनीच रेवती रमण यांच्याशी संपर्क साधला होता असा दावा दावा अमरसिंग यांनी केला.समाजवादी पक्ष माजी नेते अमरसिंह म्हणतात, रेवती रमण सिंग यांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही. तर त्यांनीच रेवती रमण यांना गाठलं. कारण त्यांना माझ्यापर्यंत यायचं होतं.पण यावर भाजपचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणतात, जेव्हा आम्ही ही भलीमोठी रक्कम वाटली जात असल्याचं पाहिलं आम्ही त्यांना सल्ला दिला जर तुम्हाला वाटत असेल की धाडसी पाऊल उचलावे तर हे प्रकरण उजेडात आणा त्यावेळी त्यांनी प्रकरण उजेडात आणण्याचा निर्णय घेतला.दुसर्‍या दिवशी सकाळी विश्वासदर्शक ठरावाच्या काही तासांपूर्वी आणखी एक बैठक रेकॉर्ड करण्यासाठी या असं आयबीएन-नेटवर्कला सांगण्यात आलं. आम्ही अमरसिंगना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जात असल्याचे अर्गल आणि कुलस्ते यांनी आमच्या टीमला सांगितले. आमच्या टीमने अमरसिंग यांच्या घराबाहेर वाट पाहिली. आत काय घडलं ते भाजपच्या खासदारांनी सांगितलं. भाजप नेते अशोक अरगल म्हणतात, उन्होंने कहा की सांसद तो हमारे बहुत हो चुके हैं. फिर भी हम आपका सपोर्ट चाहते हैं. उन्होंने कहा की हम आपको 3-3 करोड रुपये अनुपस्थिती के लिए देंगे. उसके बाद उन्होंने कहा की टोकन मनी आप अभी ले जाएं. हमने कहा की बाहर काफी मीडिया खडी हुई है, इसलिए हम अभी ऐसा कुछ नहीं करेंगे.पण या खासदारांना आपण कधीच भेटलो नाही, असा दावा अमरसिंग यांनी केला. अमर सिंह म्हणतात, जेव्हा तुम्ही माझ्या घरी आलेला असाल त्यावेळी तुम्हाला तिथं ढोल आणि नगार्‍याचा पाहायला मिळाले असतील. कोणत्याही सुरक्षेविना शेकडो लोक तिथल्या लॉनवर फिरत होते. म्हणजेच माझं सरकारी निवासस्थान साध्या घरासारखं झालं होतं.प्रश्न : ते तुमच्या बंगल्यात कारमधून आले. आणि तुम्हाला माहीत नाही...?अमर सिंह : ते तिथं आले पण माझी भेट न घेताच परतले. जर ते मोठे स्टींग मास्टर्स होते तर मग त्यांनी माझ्या घरात येऊन स्टींग ऑपरेशन करायला हवं होतं.आयबीएन-नेटवर्कच्या टीमने भाजपच्या दोघा खासदारांचा अशोक अर्गल यांच्या घरापर्यंत पाठलाग केला. त्यांनी सांगितले की, अर्गल आणि कुलस्ते यांना मतदानाच्या वेळी गैरहजर राहण्यासाठी प्रत्येकी तीन कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आलं. टोकन अमाऊंट घेऊन एक व्यक्ती येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आयबीएन-नेटवर्कचे कॅमेरे सुरू करण्यात आले. आणि थोड्या वेळानंतर एक मोठी बॅग घेऊन दोन व्यक्ती आल्या पहिल्या व्यक्तीने आपली ओळख संजीव सक्सेना अशी करून दिली.महावीर भगोरा - देख तो लो की पूरें हैं की नहीं. भाजपचे खासदार महावीर बगोरा यांनी सांगितलं की सक्सेना यानं भाजपच्या खासदारांशी अमरसिंग यांचा संपर्क करून दिला.संजीव सक्सेना - यस सर, मैं संजीव बोल रहा हूँ. हा अशोकजी है और एक महावीर सिंग भगोरा राजस्थान से है. जो आप बात कर रहें हैं. बगोरा, बगोरा हाँ जी कुलस्ती जी..जी सर, जी सर, मैं बात करता हूँ, लीजिए बात कीजिए.अशोक - 1 करोड प्राप्त हो गया. 1 पूरा प्राप्त हो गया. जी ठीक है...मालूम है, ठीक है सर.पण संजीव सक्सेना यांच्याशी आपला संपर्क नव्हता, असा दावा अमरसिंग यांनी केला. सक्सेना हे अमरसिंग यांच्यासाठी काम करत होते, याचे पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा होता.संजीव सक्सेना यांनी 4 फिरोजशहा रोड सोडल्यानंतर आयबीएन-नेटवर्कच्या टीम टेबलावर पडलेले पैसे कॅमेराबद्ध केले. आणि भाजपच्या तीन खासदारांशी बातचीत केली. त्यानंतर ही टीम ऑफिसकडे परतली. दोन्ही दिवसांच्या रेकॉर्डिंगच्या सीडिज नंतर लोकसभेच्या सभापतींकडे सादर करण्यात आल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading