• होम
  • व्हिडिओ
  • बॉलिवूड ब्लॉकब्लास्टर सुपरस्टार्स : शर्मिला टागोर
  • बॉलिवूड ब्लॉकब्लास्टर सुपरस्टार्स : शर्मिला टागोर

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Aug 11, 2011 12:34 PM IST | Updated On: Aug 11, 2011 12:34 PM IST

    अपुर संसार ते कश्मिर की कली. फार कमी जण इतक्या वेगवेगळ्या टोकाच्या भूमिकात शिरू शकतात. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये शर्मिला टागोरनं हे अनेक वेळा केलं. ऍन इव्हिनिंग इन पॅरिसमध्ये स्वीम सूटमध्ये असलेली शर्मिला आराधनामध्ये पांढर्‍या केसांची वयोवृद्ध स्त्री बनली होती. 1946ला जन्मलेल्या शर्मिलाची करियर वयाच्या 14व्या वर्षी सुरू झाली. तिनं अपुर संसारच्या त्रयीमध्ये बालिकावधूचं काम केलं. सत्यजीत राय यांनी तिची निवड केली, तेव्हा ती होती 14 वर्षांची.सत्यजीत रायचा सिनेमा होता म्हणून घरून कुणीच विरोध केला नाही. एका रात्रीत माझी व्यक्तिरेखा अपर्णा बंगालमध्ये लोकप्रिय झाली.1960 मध्ये अपू संसारनंतर एक वर्षांनं सत्यजीत राय यांच्याबरोबर तिनं अजून एक सिनेमा केला. तो म्हणजे देवी..त्यावेळी ती शाळेत होती. त्यात तिनं स्वत:ला कालीचा अवतार समजणार्‍या एका सुनेची भूमिका केली होती.तिचा दुसरा सिनेमा देवी सर्वोत्तम अभिनय होता. खूप शांत, तरीही ठळक अशी भूमिका होती.प्रसिद्धी मिळूनही तिला हवं तसं आयुष्य मिळत नाही. त्याचा परिणाम तिच्यावर होतो. शर्मिला आपल्या अभिनयाचं श्रेय तिचे गुरू सत्यजीत राय यांना देते. तुम्ही लहान असता तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो. कारण राय कोण आहेत, हेच माहीत नसतं. मला आठवते ती त्यांची उंच मूर्ती. त्यांच्या बरोबर असताना विश्वास वाटायचा. आज ते असते तर बरंच काही त्यांना विचारता आलं असतं.बंगाली सिनेमात शर्मिलासाठी राय यांचं जे स्थान होतं, ते स्थान बॉलिवूडमध्ये शक्ती सामंतांचं होतं. 1964 मध्ये शर्मिलानं शक्ती सामंतांचा कश्मिर की कली सिनेमा केला. आणि हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.मुंबईला आले तेव्हा मनात भीती होती, पण सगळं बदललं. दिवाना हुआ बादलच्या वेळी मला कार्डबोर्डसारखे वाटलं. पण आता मागे वळून बघते तर तेही गोड वाटते.कश्मीर की कलीनंतर शर्मिलानं ऍन इव्हिनिंग इन पॅरिसमध्ये शम्मी कपूरबरोबर डबल रोल केला. तिनं सिनेमात घातलेला स्वीमिंग सूट हा चर्चेचा विषय ठरला. फिल्म फेअरवरही तिनं बिकनीमधला आपला फोटो दिला होता. मॅगझीनच्या कव्हरवर बिकनीमध्ये फोटो देणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.मी आमने सामने आणि इव्हिनिंग इन पॅरिसमध्ये स्वीमिंग कॉस्च्युम घातला होता. पण मी काही पहिलीच नव्हते. याआधी नूतनही स्वीमिंग कॉस्चुम घातलेला. पण फिल्म फेअरवरचा बिकनी फोटो मीच पहिला दिला आणि त्यावर चर्चा झाली.शर्मिलाने स्वत:ला अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं असलं तरी, तिच्यातला सर्वोत्तम अभिनय अजून पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आणि मग आराधना आला. या सिनेमानं तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचं फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळवून दिलं. त्या वेळी अभिनेत्री स्क्रीनवर वृद्ध स्त्रीची भूमिका साकारायला तयार नसायच्या . पण शर्मिलानं वेगळी वाट निवडली. तिनं 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची स्त्री उभी केली. अगदी नवोदित राजेश खन्नाची आई व्हायचं धाडस तिनं दाखवलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. आराधना शर्मिला टागोरच्या करियरमधला महत्त्वाचा सिनेमा होता.70च्या दशकात शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांनी अनेक हिट सिनेमे दिले. त्यात असित सेनचा सफर, यश चोप्रांचा दाग आणि अविस्मरणीय असा अमरप्रेम. अमरप्रेममध्ये शर्मिलाने पुष्पा उभी केली होती. कोलकत्याचेया कोठ्यावर विकली गेलेली एक गावातली मुलगी. आनंदबाबूच्या भूमिकेतला राजेश खन्ना तिचा प्रियकर. अमरप्रेम बॉक्स ऑफिसवर चालला. शिवाय समीक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलं. शर्मिला आणि भारतीय क्रिकेटर नबाब मन्सुर अली खान पतौडी यांचं अफेअर सुरू होतं. त्यावेळीच ऍन इव्हिनिंग इन पॅरिसचंही शूटिंग चाललेलं. दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने दोघांच्या कुटुंबाने या नात्याला मान्यता देण्यासाठी चार वर्ष लावली. शर्मिलाने इस्लाम धर्म स्वीकारला. ती आयेशा सुलताना बनली आणि सरते शेवटी मन्सूर अली खान पतौडींशी 1969 डिसेंबरमध्ये लग्न केलं.लग्नानंतरही शर्मिलाच्या लोकप्रियतेत फारसा फरक पडला नाही. तीन मुलांची आई होऊनही ही अभिनेत्री कॅमेराच्या समोरच राहिली.2006 मध्ये शर्मिलाला विरूध्दसाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचं फिल्म फेअर नॉमिनेशन मिळालं होतं. आपल्या मृत मुलाला न्याय मिळावा म्हणून लढणारी आई तिनं उभी केली होती. 60 वर्षांची शर्मिला त्यावेळी नॉमिनेशन असलेल्या राणी मुखर्जी, प्रिती झिंटा आणि विद्या बालन यांना स्पर्धा देत होती. अभिनेत्री आणि सेन्सॉर बोर्डाची हेड असले्‌ल्या शर्मिलानं आपले व्यावसायिक आणि व्यक्तिगत आयुष्य यांचा मेळ चांगला साधलाय. तिला प्रेमाने बंगाल टायगरेस म्हणतात. या हरहुन्नरी अभिनेत्रीनं आपलं वेगळेपण जपले. अनेक पठड्या मोडल्यात. आजही तिच्या काळच्या अभिनेत्रींपेक्षा ती जास्त वेळा कॅमेर्‍यासमोर येते.तुम्ही जेव्हा कॅमेर्‍यासमोर असता, तेव्हा तुम्ही कोणी वेगळेच असता. तो जादुई क्षण असतो. तुम्ही कलाकार असाल तेव्हाच ते समजू शकालं. मला स्वत:लाच पाहायला आवडत नाही. पण कॅमेर्‍यासमोर असणं मला आवडतं.- शर्मिला टागोर

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading