#फैसलासलमानचा, दिवसभरात काय घडलं?

#फैसलासलमानचा, दिवसभरात काय घडलं?

  • Share this:

salman khan_in_court06 मे : बॉलिवूडचा दंबग स्टार, सल्लुमियाँ, भाईजान असा नावाने ओळखला जाणार धडाकेबाज अभिनेता सलमान खान...पण अशा अभिनेत्याला आज भारतीय न्यायसंस्थेपुढे अश्रू गाळात गुडघे टेकावे लागले. फुटपाथ अपघात प्रकरणी सलमानाचं काय होणार याची उत्सुक्ता सर्वांना लागली होती. अखेरीस मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली. नेमकं दिवसभरात काय घडलं त्याचा हा विस्तृत आढावा...

 

सकाळी 9.51 वा. - सलमान खान घरातून कोर्टाकडे रवाना

- घरातून निघताना सलमाननं वडिलांची गळाभेट घेतली

सकाळी 10.15 वा. सलमानचा भाऊ सोहेल, बाबा सिद्धिकी कोर्टाकडे रवाना

सकाळी 10.45 वा. - सलमानच्या चाहत्यांकडून ठिकठिकाणी नमाज

सकाळी 11.05 वा. - सलमान खान सेशन्स कोर्ट रूममध्ये दाखल

सकाळी 11.10 वा. - कोर्टासमोर सुनावणी सुरू

सकाळी 11.18 वा. - कोर्टाने सलमानला दोषी धरलं

सकाळी 11.19 वा. - अपघातावेळी सलमान मद्यधुंद अवस्थेत होता, त्याच्याकडे लायसन्सही नव्हतं -कोर्ट

सकाळी 11.20 वा. 'या गुन्ह्यात तुला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, तुला काही सांगायचं', कोर्टाची सलमानला विचारणा

सकाळी 11.21 वा. - कोर्टाने विचारणा करून सलमान काहीच बोलला नाही, त्यानं फक्त वकिलाकडे कटाक्ष टाकला

सकाळी 11.22 वा. - सलमानच्या वकिलाकडून युक्तिवाद सुरू, सलमानला कमीत कमी शिक्षा करण्याची मागणी

सकाळी 11.25 वा. - सलमाननं सामाजिक कार्याची दखल घेऊन तरी कोर्टाने त्याला माफी द्यावी, सलमानच्या वकिलाची कोर्टाकडे याचना, कोर्ट मात्र. शिक्षेवर ठाम

सकाळी 11.42 वा. - शिक्षा होणार असल्याचं स्पष्ट होताच सलमानला घाम फुटला, सलमानची बहीण अर्पिता आणि अलविराही कोर्टातच रडल्या

सकाळी 11.50 वा. - सलमान दोषी धरल्याचं कळताच सलमानच्या आईची प्रकृती बिघडली

दुपारी 12.01 वा. - कोर्ट रूममध्येच मुंबई पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतलं

दुपारी 12.02 वा. - माझी शिक्षा कमी करावी, सलमानची कोर्टाकडे याचना

दुपारी 12.12 वा - हेमामालिनीकडून सलमानविषयी सहानुभूती व्यक्त, ''मी प्रार्थना करते, सलमानला शिक्षा होऊ नये.''

दुपारी 1.15 वा. - कोर्टाने अंतिम निकाल सुनावला, सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 25 हजारांचा दंड

- शिक्षा ऐकल्यानंतर सलमानला कोर्टातच रडू कोसळलं

दुपारी 1.39 वा. - सलमानची जामिनासाठी हायकोर्टात धाव

दुपारी 1.57 वा. - सलमानकडून जामिनासाठी अर्ज दाखल

दुपारी 4.30 वा. - सलमानच्या जामिनावर हायकोर्टात सुनावणी

दुपारी 4.51वा. - सलमानला तात्पुरता दिलासा, हायकोर्टाकडून 2 दिवसांचा अंतरिम जामीन

- निकालाची प्रत मिळाली नाही म्हणून सलमानला जामीन

 

Follow @ibnlokmattv

First published: May 6, 2015, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading