विखे पाटील शिवसेनेत जाणार की भाजपात ? 'या' प्रचार सभेमुळे मोठा संभ्रम

विखे पाटील शिवसेनेत जाणार की भाजपात ? 'या' प्रचार सभेमुळे मोठा संभ्रम

पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील हे 27 एप्रिल रोजी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

संगमनेर, 26 एप्रिल : संगमनेर इथे राहुल गांधी यांची सभा सुरू होत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील हे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रीय झाले आहेत. त्यामुळे विखे पाटील काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार यावर शिक्कामोर्तब झालं असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. पदाचा राजीनामा दिला असला तरी विखेंनी पक्षासंदर्भात अद्याप कोणतीही भूमिका मांडली नाही. असं असताना त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक केलं. त्यामुळे विखे शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार यावरही मोठ्या राजकीय चर्चांणा उधान आलं आहे.

दरम्यान, पदाचा राजीनामा दिल्यानंतर विखे पाटील हे 27 एप्रिल रोजी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ साकुरी गावात विखे पाटलांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्याचबरोबर पवार आणि बाळासाहेब थोरातांवर निशाना साधला. तर सगळ्यात विशेष म्हणजे या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं. 'मोदींचा जे जमतं ते पवार आणि थोरातांना का समजत नाही' असा सवालही यावेळी विखे पाटलांनी विचारला.

हेही वाचा : नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांचे दातच तुटले पाहिजेत - ममता बॅनर्जी

ते पुढे म्हणाले की, 'आमच्या सांगण्यावरून नगरच्या सभेत मोदींनी स्वतंत्र पाणी मंत्रालयाची घोषणा केली. पण पवार आणि थोरातांकडून फक्त भावनिक आणि व्यक्तिगत राजकारण करण्यात आलं.' असं म्हणत विखे पाटलांनी पवारांवर आणि थोरातांवर टीका केली.

पण दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्यामुळे विखे पाटलांना कारणा दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षविरोधी भुमिकेबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देश विखे पाटलांना देण्यात आले आहेत. तर कोणत्याही कारवाईला मी घाबरत नाही असं वक्तव्य शिवसेनेच्या प्रचार सभेत विखे यांनी केलं होतं.

राधाकृष्ण विखेंनी 'हात' सोडला, आता कोणता झेंडा 'हाती'?'

मुलाला पक्षाने जागा मिळवून दिली नाही म्हणून पक्षावर नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे विखे आता 27 तारखेला काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अहमदनगरचे मतदान पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. गावी गावी ते समर्थकांच्या बैठका घेत आहेत. विखे पाटील हाच आमचा पक्ष असून ते जो आदेश देतील त्यानुसार काम करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

विखेंच्या गोटातील भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि बाळासाहेब थोरात यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी विखे विरोधकांची मोट बांधली. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे थोरात यांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : VIDEO : भाजप नेत्याच्या विमानातून उतरवला पैशांनी भरलेला बाॅक्स, अनिल गोटेंचा गंभीर आरोप

विखेंची शिर्डीकडे कूच

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात कोणत्याही काँग्रेसच्या सभेला हजेरी लावली नाही. राधाकृष्ण विखे दक्षिण नगरमध्ये मुलाच्या विजयासाठी मोट बांधत होते. आता नगरच्या मतदानानंतर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत.

विखेंना मानणारे सर्व कार्यकर्ते आजपर्यंत कोणाच्याही प्रचारापासून अलिप्त आहेत. ज्या काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी श्रीरामपूर येथे समर्थकांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरच टीका केली होती. 'जो पक्ष मला न्याय देवू शकला नाही त्याचा प्रचार का करावा' असं विखे पाटील म्हणाले होते.

27 तारखेला मांडणार भूमिका

आज विखे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र मी येत्या 27 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विखे पाटलांचा राजीनामा स्वीकारला आहे.

आता विखे विरुद्ध थोरात सामना

नगरची लढाई विखे विरूद्ध पवार अशी रंगली होती तर आता शिर्डीची लढाई विखे विरूद्ध थोरात अशी रंगणार आहे. विखे समर्थक असलेल्या करण ससाणे यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा संगमनेर येथे होते आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या श्रीरामपूर येथे सभा घेत आहेत. विखे आणि थोरात यांच्यात शह कटशहाच्या राजकारणात आता कोणाचा विजय होणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

SPECIAL REPORT : मोदींना बदलत्या हवेचा अंदाज आलाय का?

First published: April 26, 2019, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading