शेवटच्या सभेत आज राज ठाकरे करणार मोठी पोलखोल, 'या' ट्विटमधून संकेत

शेवटच्या सभेत आज राज ठाकरे करणार मोठी पोलखोल, 'या' ट्विटमधून संकेत

लोकसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या शेवटच्या जाहीर सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या सभांच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल करत आहोत. आम्ही सत्य दाखून या मोदी सरकारची पोलखोल करत आहोत, असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या शेवटच्या जाहीर सभेत राज ठाकरे मोठी पोलखोल करतील, असे संकेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून दिले आहेत.

'आज नाशिकच्या सभेत पोलखोलचा ग्रँड फिनाले', असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पनवेलच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल

राज ठाकरे यांची गुरुवारी पनवेलमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी लाव रे तो व्हिडिओ स्टाईलचा वापर करत मोदींच्या प्रचारसभेत एका व्हायरल व्हिडिओची पोलखोल केली. यावेळी मोदींची प्रचारसभा म्हणून व्हायरल होत असतानाचा व्हिडिओ चक्क दिवंगत भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयींच्या अंतयात्रेच्या वेळेचा असल्याचं भीषण वास्तव समोर आलं. तसंच अमित शहा यांच्या 'पटक देंगे' या वाक्याची आठवण करून देत भाजप-सेनेच्या लाचारपणावरही घणाघात केला.

या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मोदींनी गुजरातमधील दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ लावत राज यांनी पोलखोल केली.

पोलिसाने तरुणाला प्लास्टिकच्या पाईपने झोडपले VIDEO VIRAL

First published: April 26, 2019, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading