समुद्रकिनाऱ्यावर बंगला भाड्याने घेऊन सुरू होता देहविक्रीचा गोरखधंदा

समुद्रकिनाऱ्यावर बंगला भाड्याने घेऊन सुरू होता देहविक्रीचा गोरखधंदा

अलिबागच्‍या समुद्र किनाऱ्यावर बंगला भाडयाने घेऊन देहविक्रीच्या गोरखधंद्याचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने भंडाफोड केला आहे.

  • Share this:

रायगड, 29 जून- अलिबागच्‍या समुद्रकिनाऱ्यावर बंगला भाड्याने घेऊन देहविक्रीच्या गोरखधंद्याचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने भंडाफोड केला आहे. किनारपट्टी भागात बंगला भाड्याने घेऊन महिलांकडून देहविक्री तसेच अंमली पदार्थ विक्रीचा व्‍यापार केला जात असल्‍याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकून 26 ग्रॅम कोकेन जप्‍त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील एका बंगल्यावर सेक्स रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी  बंगल्यातून काही महिला आणि पुरूषांना ताब्यात  घेतले. ते सगळे मद्य आणि ड्रग्सच्या नशेत होते. याशिवाय, पोलिसांनी बंगल्यातून ड्रग्स डिलर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची पोलिसांनी कर्जत इथल्या महिला सुधारगृहात रवानगी करण्‍यात आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अलिबाग जिल्हा कोर्टात हजर केले असता त्यांना 3 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर अशी आरोपींची नावे आहेत.

पुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक

पुणे पोलीसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 488 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर आठ लाख रुपये रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या आणि होंडा सीआरव्ही कार असा एकूण 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेरमध्ये तो राहात होता. बाणेर-औंध परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

याआधी 2013 मध्ये ही या आरोपीवर अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी कारवाई झाली होती. त्यात त्याला चार वर्षे कारवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपल्यानंतर तो पुन्हा अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली आहे.

भररस्त्यात महिलांचं हमरी-तुमरी, तुंबळ मारहाणीचा VIDEO व्हायरल

First published: June 29, 2019, 5:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading