शाहीर आत्माराम पाटील यांचे निधन

शाहीर आत्माराम पाटील यांचे निधन

10 नोव्हेंबरसंयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात महत्वाची भूमिका बजावलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांचे आज मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 'एका शाहिराची कथा' या त्यांच्या चरित्राचे गेल्याच महिन्यात प्रकाशन झाले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे लेखन धारदार आणि स्फुर्तीदायी होते. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरची गीत, विडंबन अशा पद्धतीचे लेखन त्यांनी केले शिवाय पोवाडे, लावण्या, समरगीत, समूहगीत अशा स्वरुपाचे विपुल लेखन ही त्यांनी केले. मराठी भाषेत झालिया मिसळकर्ता कर्म सारं इंग्रजी दिसंलक्रियापदापुरता मराठी असंलइस्टॉप-बंद बेटा पब्लिकहसंल हंसल तो सूं थयुं धिस इज अ बॉम्बेसब मिक्श्चर बन गयी मिसळ झाली रं दादा मिसळ झाली मुंबई1966 मध्ये शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिलेलं हे गीत. भाषेबद्दलच नव्हे तर मुंबईतल्या लोंढ्याविषयी त्यांनी 1959 मध्ये लाखाची लावणी नावाची लावणी लिहिली. तर 1965 मध्ये त्यांनी 'उपर्‍यांनी येथं केली सारी मिरासदारी ' नावाचं गीत लिहिलं.या मुंबईत अमुच्या आम्ही झालो भिकारी उपर्‍यांनी इथे केली सारी मिरासदारी शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर अमरशेख आणि शाहीर नानिवडेकर यांच्यासोबत शाहीर आत्माराम पाटील यांची शाहिरी लेखणी आणि डफही गाजत होते. स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन तसंच चीन, पाकिस्तानबरोबरचं युद्ध या विषयांवर त्यांची शाहिरी लेखणी परखडपणे चालली. पोवाडे, लावण्या, समूहगीत अशा अनेक गीतांचं लेखन त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनोभा भावे, इतकंच नाही तर इंदिरा गांधी आणि आणीबाणी यावरही त्यांनी गीतं रचली... आत्माराम पाटील यांचा जन्म - 1924 मध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सफाळ्यागावाजवळ झाला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरु होतं. शिक्षण सातवी पर्यंत झालं. त्यानंतर 1945 साली ते पोटापाण्यासाठी मुंबईला आले. पुढे त्यांनी भाजीविक्रेता म्हणूनही काही काळ काम केलं. हा भाजीविक्रेता हळूहळू भाजी व्यापारी झाला. लिहण्याची आवड आणि चळवळीचे नकळत झालेले संस्कार यामुळे त्यांच्या लेखणीला धार होती. तेव्हा ते जे काही लिहित ते व्यापारी आणि भांडवलदारांच्या विरोधात. पण नंतर त्यांनी धरतीनंदन या नावाने लिखाण सुरु केलं. आत्माराम पाटील यांचा 'संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा' हा गोंधळ खूप गाजला. शिवाजी पार्कवर सादर केलेल्या या गोंधळाने नंतर संपूर्ण महाराष्ट्रात लोकजागृती केली.

  • Share this:

10 नोव्हेंबर

संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलनात महत्वाची भूमिका बजावलेल्या शाहीर आत्माराम पाटील यांचे आज मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 'एका शाहिराची कथा' या त्यांच्या चरित्राचे गेल्याच महिन्यात प्रकाशन झाले होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे लेखन धारदार आणि स्फुर्तीदायी होते. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवरची गीत, विडंबन अशा पद्धतीचे लेखन त्यांनी केले शिवाय पोवाडे, लावण्या, समरगीत, समूहगीत अशा स्वरुपाचे विपुल लेखन ही त्यांनी केले.

मराठी भाषेत झालिया मिसळ

कर्ता कर्म सारं इंग्रजी दिसंल

क्रियापदापुरता मराठी असंल

इस्टॉप-बंद बेटा पब्लिक

हसंल हंसल तो सूं थयुं

धिस इज अ बॉम्बे

सब मिक्श्चर बन गयी

मिसळ झाली रं दादा

मिसळ झाली मुंबई

1966 मध्ये शाहीर आत्माराम पाटील यांनी लिहिलेलं हे गीत. भाषेबद्दलच नव्हे तर मुंबईतल्या लोंढ्याविषयी त्यांनी 1959 मध्ये लाखाची लावणी नावाची लावणी लिहिली.

तर 1965 मध्ये त्यांनी 'उपर्‍यांनी येथं केली सारी मिरासदारी ' नावाचं गीत लिहिलं.

या मुंबईत अमुच्या आम्ही झालो भिकारी

उपर्‍यांनी इथे केली सारी मिरासदारी

शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर अमरशेख आणि शाहीर नानिवडेकर यांच्यासोबत शाहीर आत्माराम पाटील यांची शाहिरी लेखणी आणि डफही गाजत होते.

स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन तसंच चीन, पाकिस्तानबरोबरचं युद्ध या विषयांवर त्यांची शाहिरी लेखणी परखडपणे चालली. पोवाडे, लावण्या, समूहगीत अशा अनेक गीतांचं लेखन त्यांनी केलं.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, विनोभा भावे, इतकंच नाही तर इंदिरा गांधी आणि आणीबाणी यावरही त्यांनी गीतं रचली...

आत्माराम पाटील यांचा जन्म - 1924 मध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सफाळ्यागावाजवळ झाला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन सुरु होतं. शिक्षण सातवी पर्यंत झालं. त्यानंतर 1945 साली ते पोटापाण्यासाठी मुंबईला आले.

पुढे त्यांनी भाजीविक्रेता म्हणूनही काही काळ काम केलं. हा भाजीविक्रेता हळूहळू भाजी व्यापारी झाला. लिहण्याची आवड आणि चळवळीचे नकळत झालेले संस्कार यामुळे त्यांच्या लेखणीला धार होती.

तेव्हा ते जे काही लिहित ते व्यापारी आणि भांडवलदारांच्या विरोधात. पण नंतर त्यांनी धरतीनंदन या नावाने लिखाण सुरु केलं. आत्माराम पाटील यांचा 'संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा' हा गोंधळ खूप गाजला.

शिवाजी पार्कवर सादर केलेल्या या गोंधळाने नंतर संपूर्ण महाराष्ट्रात लोकजागृती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2010 04:11 PM IST

ताज्या बातम्या