गप्पा उल्हास लाटकर आणि प्रकाश खांडगेंशी (भाग : 2)

सलाम महाराष्ट्रचे पाहुणे होते उल्हास लाटकर आणि प्रकाश खांडगे.बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणं हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला ऐतिहासिक दिवस आहे. कारण ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आहेत. तर अशा या इंटरेस्टिंग माणसावर पुस्तकं बाजारात येत आहेत. आतातर मराठीतूनही ओबामांच्या अत्तापर्यंतच्या प्रवासावरची पुस्तकं मराठी वाचकांसाठी उपलब्ध होतायत. आणि त्याचं श्रेय जातं ते अमेय प्रकाशनला. त्यानिमित्ताने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अमेय प्रकाशनच्या उल्हास लाटकर आले होते. उल्हास लाटकर ओबामांच्या पुस्तकाविषयी सांगतात, " ओबामांच्या ' ड्रीम फ्रॉम माय फादर ' आणि ' द ओडायसिटी ऑफ होप ' या दोन पुस्तकांचा मराठी अनुवाद अमेय प्रकाशन करत आहे. या दोन्ही पुस्तकांमधून बराक ओबामा यांचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं. अतिशय कठीण परिस्थितीतून ओबामांचं बालपण गेलेलं आहे. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला. आणि कदाचित त्यातूनचं त्यांचा दृष्टिकोन सर्वसमावेशक झाला आहे. अत्यंत सकारात्मक असा दृष्टिकोन त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येतो. आणि त्यामुळेचं ' यस वुई कॅन ' या त्यांच्या भाषणातून सगळ्यांना तो दिसला आणि बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. या पुस्तकांमधून त्यांनी त्यांच्या जीवनातलेे अनेक छोटे मोठे किस्से लिहिलेले आहेत. काही वेळेला वाट्याला आलेले अपमानाच्या क्षणांबद्दल लिहिताना त्यांचा संयमीपणा दिसून येतो. त्या क्षणांबद्दल कुठेही राग त्यांनी व्यक्त केलेला नाहिये. असे अनेक ओबामांच्या जीवनातले प्रसंग या पुस्तकांमधून वाचकांच्या भेटीला येणार आहेत."23 आणि 24 जानेवारीला मुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सवाला सुरुवात होतेय. त्या निमित्ताने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये परंपरा महोत्सवाचे प्रमुख प्रा. प्रकाश खांडगे यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या. प्रा. प्रकाश खांडगे. मुंबई विद्यापीठातल्या लोककला विभागाचे ते प्रमुख आहेत. भारतीय लोककलांचा ते गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करताहेत. परंपरा महोत्सवाविषयी प्रकाश खांडगे सांगतात, " परंपरा महोत्सवातून महाराष्ट्रातल्याच नाहीतर संपूर्ण भारतातल्या लोककलांचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. यामध्ये फक्त लोकललांचं सादरीकरणचं नाही तर त्याविषयीची व्याख्यानंही होणार आहेत." मुंबई विद्यापीठातल्या लोककला विभागाविषयी खांडगे सर सांगतात, " आज लुप्त होत चाललेल्या लोककलांच्या संवर्धनाचं काम या विभागामार्फत केलं जातं. आणि आजच्या तरुणांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या अस्सल लावणीपासून ते विविध राज्यातल्या ताल वाद्यांपर्यंत तरूणांचा ओढा दिसून येतोय. एवढंच नाही तर भारता बाहेरही भारतीय लोककलांचा अभ्यास आता केला जातोय." प्रा. खांडगे यांना शासनाचा ' लोकदान ' हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचबरोबर वॉशिंग्टन इथे झालेल्या परिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर सलाम महाराष्ट्र हा ' लोकल टू ग्लोबल 'असे विषय समाविष्ट करणारा होता. उल्हास लाटकर आणि प्रकाश खांडगे यांच्याबरोबरच्या गप्पा व्हिडिओवर पाहता येतील.

  • Share this:

Tags:
First Published: Jan 21, 2009 05:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading