प्रवास दोन निसर्गप्रेमींचा (भाग : 2)

प्रवास दोन निसर्गप्रेमींचा (भाग : 2)

मुक्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे वाली कोण ? असा प्रश्न विचारणा-यांना उत्तर आहे भाऊ काटदरे आणि बी.एस. कुलकर्णी. हे दोघंही निसर्ग मित्र म्हणून ओळखल जातातच. त्याहीपेक्षा मुक्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे ' आवाज ' ही त्यांची खरी ओळख आहे. हे दोघंही ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. रत्नागिरीचे भाऊ काटदरे हे सह्याद्री मित्र संघटनेचे संस्थापक आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू केलीये. या मोहिमेमुळे 16 हजार कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं. समुद्री गरूड आणि गिधाडांची संख्या वाढावी म्हणून ते काम करताहेत. महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळावर ते सदस्य आहेत.पक्ष्यांची घरटी वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे प्रयत्न सुरू आहेत. काटदरे सरांचे सह्याद्री मित्र संघटना स्थापण्याचे अनुभव फारच मजेशीर आहेत. काटदरे सांगतात, " निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे या इच्छेनं काही समविचारी लोकांना एकत्र आणून सह्याद्री निसर्ग मित्रमंडळ या संस्थेची स्थापना चिपळूणमध्ये 1992 साली करण्यात आली. सुरुवातीला आम्हाला अक्षरश: वेड्यात काढलं जायचं. दोन दोन तास एकाच जागेवर बसून पक्षांचं बारकाईनं निरीक्षण करणं हे सोपं नाहीये. लोक आमच्या कामाला रिकामटेकड्यांचं काम समाजयचे. पण आम्ही आमची चिकाटी सोडली नाही. निसर्ग संवर्धनाविषयी लोकांमध्ये जागृती घडवून आणणं, त्यासाठी शाळांशाळांमध्ये जाऊन निरनिराळे उपक्रम राबणं, पत्रकं वाटणं असं सगळं आमच्या कामाचं स्वरुप होतं. त्यातूनच मी पांढ-या कोटाचा गरुड, भारतीय पाकोळी, कासवांच्या निरनिराळ्या जातींचा शोध आम्ही लावला. भाऊ काटदरेंची कासव बचाव मोहीमही भरपूर प्रसिद्ध आहे. त्याविषयी ते सांगतात, " समुद्रात मासळी मिळण्याच्या प्रमाणात केव्हा घट होते जेव्हा समुद्रतळ साफ नसतात तेव्हाच. समुद्रतळ स्वच्छ ठेवण्यात तसंच समुद्री पर्यावरणाचा समतोल राखण्यात सागरी कासवांची भूमिका अनन्य साधारण आहे. भारतात पाच प्रकारच्या समुद्री कासवांच्या जाती सापडतात. समुद्री कासव त्यांची अंडी खाल्ली जातात. त्यामुळे समुद्री कासवांच्या प्रमाणात घट होत असल्याचं आमच्या लक्षात आलं. समुद्री कासव बचाव मोहिमेची सुरुवात रत्नागिरीपासून केली. आमच्या कार्यकर्त्यांनी किना-यावर पेट्रोलियम करून सुमारे 2300 समुद्री कासवांची पिल्लं समुद्रात सोडली. ही घटना 2001 सालची आहे. त्यावेळी रत्नागिरीच्या सागरी उत्पादनात वाढ झाली. मग आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सगळ्या सागरी किना-यांवर राबवत आहोत. महाराष्ट्रात 32 ठिकाणी हा प्रकल्प आहे." सध्या भाऊंच्या पक्ष्यांची घरटी वाचवण्याच्या कामानं वेग घेतला आहे. महाराष्ट्रात पक्षीमित्र बी.एस. कुलकर्णीच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. हाडाचे शिक्षक असणा-या पक्षीमित्र बी.एस.कुलकणीर्ंनी सोलापूरमध्ये एक हायस्कूल स्थापन केलंय. मराठी आणि इंग्रजी या विषयाचे ते रिटायर्ड शिक्षक आहेत. 1971 सालापासून त्यांचे पक्षीनिरिक्षणावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ' पक्षीनिरीक्षण ' हे त्यांचं पहिलं पुस्तक. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट वाड्.मयाचा पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे सलीम अलींच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालंये. माळढोक पक्षी अभयारण्य व्हावं म्हणून त्यांनी कमालीचे प्रयत्न केलेत. 1981 साली जयपूरला जी माळढोक जागतिक पक्षी परिषद भरली होती,त् यात कुलकर्णी सरांनी पेपर वाचन केलं होतं. इकॉलाजी अँड बिहेवियर ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड हा त्यांचा पेपर होता. जो जगातल्या वेगवेगळ्या विद्यापीठात स्वीकारल्या गेला. बी.एस. कुलकणीर्ंच्या पक्षीप्रेमाचा श्रीगणेशा थोडा वेगळ्या पद्धतीनं झाला. ते सांगतात, " माझे आजोबा जातीवंत शिक्षक होते. मी सातवी फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मला आजोळी शाळेत येऊन शिकवायला सांगितलं. पण ते माझ्या दृष्टीनं थोडंसं अवघड होतं. कारण मी ज्या वर्गात शिकवत होतो तो त्या वर्गातली मुलं माझ्यापेक्षा वयानं मोठी आणि हुशार होती. शिक्षक म्हणजे माझं आणि त्यांचं जमायला पाहिजे. त्या दृष्टीनं मी प्रयत्न केले. इथे आजोळी येताना अनेकदा हरणांचा कळप दिसायचा. तो पाहण्यासाठी मी मुलांना घेऊन सहल काढली. तेव्हापासून माझी आणि मुलांची जी गट्टी जमली ती जमली. या अशा सहलींचा मला एक फायदा झाला तो माझ्यातला शिक्षक जागृत झालाच. त्याचबरोबरीनं मुलांच्या निसर्ग प्रेमाची जाणीव झाली." भाऊ काटदरे आणि बी.एस. कुलकर्णी यांच्या कामाविषयी जाणून घ्यायचं असेल तसंच दुर्मिळ प्राण्यांचे, पक्ष्यांचे , जलचरांचे एक्सलुझिव्ह फोटो पहायचे असतील तर शेजारच्या व्हिडिओवर क्लिक करा.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2009 04:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading