रिवाईन्ड 2008 - आढावा मराठी सिनेमांचा

रिवाईन्ड 2008 - आढावा मराठी सिनेमांचा

विजय तेंडुलकर, चेतन दातार, बी. आर. चोप्रा, जयश्री गडकर, दामू केंकरे, चंद्रकांत गोखले, जयदेव हट्टंगडी, हेरॉल्ड पिंटर, विहंग नायक, दशरथ पुजारी, गणपत पाटील, महेंद्र कपूर, ईश्मित सिंग, ... अशी कित्येक थोर व्यक्तिमत्त्व 2008 मध्ये काळाच्या पडद्याआड गेलीत. आठवणींची टेप रिवाईण्ड केली की या सगळ्यांचीच आठवण येते. या सगळ्यांची कितीही आठवण आली तरी आपल्याकडे शोमस्ट गो ऑन ही पद्धत आहे. शो मस्ट गो ऑन म्हणत वर्षभरातल्या मनोरंजन क्षेत्राचा आठावा घेऊया. मराठी सिनेमांसाठी हे वर्ष तसं चांगलंच गेलं. त्याचं मोठं श्रेय कॉर्पोरेट जगाला आहे. कारण अनेक सिनेमे कॉर्पोरेट सेक्टरनं प्रोड्युस केल्यानं सिनेमांची पब्लिसिटी चांगली झाली. प्री आणि पोस्ट प्रॉडक्शनवर बराच खर्च करता आला. वळूच्या यशानं मराठी सिनेमांकडे पाहायची लोकांची नजर बदलली. वळूसारखंच कौतुक झालं ते टिंग्याचं...झी टॉकीजच्या दे धक्कानं तर यशाचा मोठा धक्का दिला. त्यांच्याच धुडगुसनं बॉक्स ऑफिसवरही मोठा धुडगुस घातला. मुक्ता आर्टस्‌नं मराठीत वाजवलेल्या सनई चौघडेंनी प्रेक्षकांना खेचून घेतलं. अर्थात, कॉर्पोरेट क्षेत्राचा मराठी सिनेमातल्या प्रवेशामुळे हे शक्य झालं असलं तरी काहींना यातले तोटेही जाणवले.आम्ही सातपुतेमुळे सचिन पिळगावकर, उलाढालमुळे महेश मांजरेकर यांचं दर्शन बर्‍याच दिवसांनी मराठीत झालं. मराठीतल्या अनेक नव्या जुन्या कलाकारांना यावर्षी प्रेक्षकांपर्यंत पोचता आलं. सखी, पिकनिक, तहान, तांदळा..एक मुखवटा, गिल्टी, ऑक्सिजन अशा अनेक सिनेमांमुळे मराठीला नवे आणि बोल्ड विषय मिळाले. आणि मराठी सिनेमा तुळशी वृंदावनाच्या बाहेर पडला तो कायमचाच.मराठी सिनेमानं 2008 वर्ष जसं दणाणून सोडलं तसंच 2009 हे वर्षही गाजवणार असंच दिसतंय. जानेवारीत रिलीज होणारा एक डाव धोबीपछाड या सिनेमातनं पहील्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता जोशी ही जोडी निर्माते म्हणून समोर येतायत. अशोकजींबरोबरच मकरंद अनासपुरे पण निर्मितीत उतरतोय. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमाची तो निर्मिती आणि त्यात कामही करतोय. यापुर्वीच रवी राय, श्रेयस तळपदे, सुभाष घई यांनी हिट मराठी सिनेमे दिलेत. आणि 2009मध्येसुध्दा तसेच हिट देण्याच्या तयारीत ते सध्या आहेत. कलाकारांचं बोलायचं तर नवनवीन चेहर्‍यांबरोबरच मिलिंद सोमण, भाग्यश्री पटवर्धन, ह्रषिता भट्ट सारखे हिंदीतले पण मराठमोळे कलाकार आता मराठीकडे वळू लागलेत. मिलिंदचा गंध हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे, तर भाग्यश्री पटवर्धन झक मारली आणि बायको केली या सिनेमातून मराठीत येतेय. यात तिच्यासोबत भरत जाधवही असेल. यासगळ्यात मोठी उत्सुकता असेल ती म्हणजे अमिताभ बच्चनची पहीलीवहीली मराठी निर्मिती असलेल्या विहीर या सिनेमाची, ज्याचं दिग्दर्शन करतोय वळू फेम उमेश कुलकर्णी. शिवाय भरत जाधव हा मराठीतला कॉर्पोरेट चेहरा बनू पहातोय. सिनेमातला एक ब्रँड म्हणून भरत व्हीनस, टीप्स, शिमारु,यु टीव्ही सारख्या बॅनरसोबत करारबद्द होतोय. जी पुन्हा एकदा मराठी कलाकारांसाठी स्वागतार्ह गोष्ट असेल.

  • Share this:

First published: December 31, 2008, 3:55 AM IST
Tags:

ताज्या बातम्या