रिवाइंड 2008 - श्रद्धांजली

रिवाइंड 2008 - श्रद्धांजली

य. दि.फडके ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, य.दि. फडके यांचं निधन झालं. विसाव्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकाच्या खंडात्मक मालिकेद्वारे 19 व्या शतकातील महाराष्ट्राचे राजकीय जीवन य.दि. फडकेंनी अक्षरशः पिंजून काढले होते.बाबा आमटेकुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अख्ख आयुष्य वेचणारे मानवतावादी ज्येष्ठ समाजसेवक, नर्मदेवर बांधण्यात येणार्‍या सरदार सरोवरामुळं विस्थापित होणार्‍या आदिवासींच्या बाजून उभं राहणारे प्रणेते, विविध माध्यमातून अनेकांचे आधारवड बनलेले बाबा आमटे यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचाच विचार केला.बाबुराव बागुल 'वेदा आधी तू होतास' या शब्दातून बाबुराव बागुलांनी माणसाला त्यांच्या माणूसपणाची ताकद जाणवून दिली. सोशित, पीडीत, आणि तळागाळातल्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा- वेदनांना वाचा फोडणारे लेखन त्यांनी केलं. दलीत साहित्याला आपल्या लेखनीतून त्यांनी व्यापक भान दिलं.पुरस्कार, सन्मान, पैसा या सर्वांपासून ते शेवटपर्यंत दूर राहीले. बागुलांच्या निधनाने साहित्याची मोठी हानी झाली.विजय तेंडुलकरआपल्या वैचारिक बंडखोरीनं साहित्याच्या रूढ चौकटी मोडून टाकलेले आणि मराठी रंगभूमी अर्ध शतकाहून अधिक काळ धगधगती ठेवणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं निधन याचवर्षी झालं. घाशीराम कोतवालमुळं तेंडुलकरांच्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली. शांतता, गिधाडे, सखाराम बाईंडर, यासारख्या नाटकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्येही मोहोळ उठवली. गंगाधर गाडगीळमराठी सारस्वताच्या दरबारात मराठी नवसाहित्याचे प्रणेते अशी सुवर्णमुद्रा उमटवलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचं निधन झालं. त्यांच्या साहित्याचे मानदंड आणि खडक आणि पाणी या दोन ग्रंथांनी साहित्य क्षेत्राला वेगळे परिमाण दिले. नाना धर्माधिकारीदासबोधाच्या सोप्या निरूपणातून समर्थ संप्रदाय प्रणेते बनलेले ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचं देहावसान झालं. सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नानासाहेबांनी त्यांचं आयुष्य वेचलं.सॅम माणेकशॉमाजी लष्करप्रमुख आणि 1971 मधील बांग्लादेश युद्धाच्या विजयाचे शिल्पकार फील्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचं निधन याच वर्षात झालं. निर्मला देशपांडेज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांचं मे महिन्यात निधन झालं. गांधीजींच्या विचारावर आस्था ठेवून देश आणि जगभरात शांतता आणि अहिंसेसाठी निष्ठेनं काम करणारे लक्षावधी कार्यकर्ते त्यांच्या जाण्यानं पोरके झाले. गुजरातमधल्या जातीय दंगलींमध्ये त्यांच्या पुढाकारामुळं अनेकांचे जीव वाचले.व्ही.पी.सिंगशोषित आणि पीडितांचे मसीहा, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचं निधन झालं. काँग्रेसशी बंडखोरी करत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात बोफोर्स तोफ खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभर तापवून विरोधी पक्षाच्या राजकारणात जान फुंकणारे नेतृत्त्व, अशी व्ही.पी.सिंग यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे. रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

  • Share this:

य. दि.फडके ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार, य.दि. फडके यांचं निधन झालं. विसाव्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकाच्या खंडात्मक मालिकेद्वारे 19 व्या शतकातील महाराष्ट्राचे राजकीय जीवन य.दि. फडकेंनी अक्षरशः पिंजून काढले होते.

बाबा आमटे

कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अख्ख आयुष्य वेचणारे मानवतावादी ज्येष्ठ समाजसेवक, नर्मदेवर बांधण्यात येणार्‍या सरदार सरोवरामुळं विस्थापित होणार्‍या आदिवासींच्या बाजून उभं राहणारे प्रणेते, विविध माध्यमातून अनेकांचे आधारवड बनलेले बाबा आमटे यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचाच विचार केला.

बाबुराव बागुल 'वेदा आधी तू होतास' या शब्दातून बाबुराव बागुलांनी माणसाला त्यांच्या माणूसपणाची ताकद जाणवून दिली. सोशित, पीडीत, आणि तळागाळातल्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा- वेदनांना वाचा फोडणारे लेखन त्यांनी केलं. दलीत साहित्याला आपल्या लेखनीतून त्यांनी व्यापक भान दिलं.पुरस्कार, सन्मान, पैसा या सर्वांपासून ते शेवटपर्यंत दूर राहीले. बागुलांच्या निधनाने साहित्याची मोठी हानी झाली.विजय तेंडुलकरआपल्या वैचारिक बंडखोरीनं साहित्याच्या रूढ चौकटी मोडून टाकलेले आणि मराठी रंगभूमी अर्ध शतकाहून अधिक काळ धगधगती ठेवणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं निधन याचवर्षी झालं. घाशीराम कोतवालमुळं तेंडुलकरांच्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली. शांतता, गिधाडे, सखाराम बाईंडर, यासारख्या नाटकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्येही मोहोळ उठवली. गंगाधर गाडगीळमराठी सारस्वताच्या दरबारात मराठी नवसाहित्याचे प्रणेते अशी सुवर्णमुद्रा उमटवलेले ज्येष्ठ साहित्यिक आणि अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचं निधन झालं. त्यांच्या साहित्याचे मानदंड आणि खडक आणि पाणी या दोन ग्रंथांनी साहित्य क्षेत्राला वेगळे परिमाण दिले. नाना धर्माधिकारीदासबोधाच्या सोप्या निरूपणातून समर्थ संप्रदाय प्रणेते बनलेले ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचं देहावसान झालं. सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नानासाहेबांनी त्यांचं आयुष्य वेचलं.

सॅम माणेकशॉमाजी लष्करप्रमुख आणि 1971 मधील बांग्लादेश युद्धाच्या विजयाचे शिल्पकार फील्डमार्शल सॅम माणेकशॉ यांचं निधन याच वर्षात झालं. निर्मला देशपांडेज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांचं मे महिन्यात निधन झालं. गांधीजींच्या विचारावर आस्था ठेवून देश आणि जगभरात शांतता आणि अहिंसेसाठी निष्ठेनं काम करणारे लक्षावधी कार्यकर्ते त्यांच्या जाण्यानं पोरके झाले. गुजरातमधल्या जातीय दंगलींमध्ये त्यांच्या पुढाकारामुळं अनेकांचे जीव वाचले.व्ही.पी.सिंगशोषित आणि पीडितांचे मसीहा, माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचं निधन झालं. काँग्रेसशी बंडखोरी करत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरोधात बोफोर्स तोफ खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभर तापवून विरोधी पक्षाच्या राजकारणात जान फुंकणारे नेतृत्त्व, अशी व्ही.पी.सिंग यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे.

रिवाइंड 2008 - सामाजिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - साहित्य आणि पुरस्कार पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारण पहाण्यासाठी येथे क्लिक करा

रिवाइंड 2008 - दहशतवादाचा भस्मासूर पहाण्यासाठी येथे क्लिक करा

First published: December 29, 2008, 2:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading