अमळेरमध्ये होतोय बेकायदा रेतीउपसा

अमळेरमध्ये होतोय बेकायदा रेतीउपसा

9 डिसेंबर, अमळनेरप्रशांत बागनदीपात्रातून रेती उपसा करण्यास बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये रेतीचा अवैध उपसा राजरोस सुरू आहे. सरकारचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतोच आहे पण नदीपात्राचीही हानी होतेय. वाळूच्या वाहतुकीस परवानगी नसतानाही दिवसा ढवळ्या हा धंदा सुरू आहे. महसूल आणि व्यापारी यांच्या संगनमतानं हा धंदा राजरोस अमळनेरला चालतोय, असा आरोप होतोय. रेतीचा हा एक दाणा तयार व्हायला चारशे वर्ष लागतात पण बोरी नदिच्या पात्रातून या रेतीची सर्रास वाहतूक केली जातेय. लाखो रुपयांच्या महसूलाचं नुकसान होतंय अर्थातंच महसूल आणि या ठेकेदाराच्या संगनमताशिवाय हे होऊच शकत नाही.हा बेकायदा रेतीउपसा राजरोसपणे चालू असताना अधिकार्‍यांनी मात्र त्याकडे उघड उघड डोळेझाक केली आहे. "आधीपासून आमची कारवाई सुरु आहे. आमची कारवाई कायम सुरु असते आमचे तलाठी आणि सर्कल आणि आम्ही फिरत असतो" असं पठडीतलं उत्तर तहसिलदार रविंद्र सपकाळे यांनी दिलं.कोणी तक्रार केली तर नक्की कारवाई करु अशी जिल्हाधिका-यांची भूमिका आहे. "जर कोणी अशा प्रकारची तक्रार केली तर मी निश्चितपणे त्याचा तपास करेन आणि त्याप्रमाणे संबंधीत माणसांवर तसंच त्या यंत्रणेवर कारवाई केली जाईल" असं जिल्हाधिकारी कुणालकुमार यांनी स्पष्ट केलं.सत्तावीस रुपये ब्रास हा रेतीचा खरा सरकारी दर. पण या ठेकेदारी पध्दतीनं सर्वसामान्यांना रेती मिळते ती पंधराशे रुपये ट्रॅक्टर या दरानं. या पध्दतीनं काम करणारे अधिकारी जनतेचं काय भलं करणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 09:29 AM IST

ताज्या बातम्या