VIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट

VIDEO : शर्मा विरुद्ध मिश्रा, सलग सहा वेळा 'या' गोलंदाजानं काढली रोहितची विकेट

सद्यस्थितीत दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून, मागील तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात आज दिल्ली आणि मुंबई यांच्यात फिरोजशाह कोटला मैदानावर लढत होत आहे. दरम्यान कोटलाची खेळपट्टी संथ असल्यानं या मैदानावर खेळणं कठिण जाणार, असं असलं तरी रोहितनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दरम्यान, सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात करत 50चा टप्पा गाठला. तर, रोहितनंही आपलं टी-20मध्ये 8 हजार धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्यानंतर रोहित शर्माला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं ते, अमित मिश्रानं. त्यामुळं आजच्या सामन्यात मिश्रा विरुद्ध शर्मा असा सामना पाहायला मिळाला.

रोहित शर्मा आक्रमक खेळत असताना, अमित मिश्रानं रोहितला क्लिन बोल्ड केलं. पण रोहितला बाद करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सहा वेळा आयपीएलमध्ये मिश्रानं रोहितची विकेट घेतली आहे. मिश्रानं सर्वात जास्त वेळा रोहितलाच बाद केलं आहे. आणि आयपीएलमधलं आपली 150वी विकेटही घेतली.

त्यानंतर लगेचच डि कॉकही बाद झाला. त्यामुळं सध्या मुंबईचा संघ अडचणीत आला आहे. सद्यस्थितीत दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असून, मागील तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र, सामन्याआधीच दिल्लीला एक झटका बसला आहे.

बुधवारी सरावादरम्यान श्रेयसच्या हताला दुखापत झाली आहे. मात्र आजच्या सामन्यात श्रेयस खेळत असून, त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 266 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या संघाची कामगिरी या पर्वात म्हणावी तशी झालेली नाही. मुंबईला गेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय तर एका समान्यात पराभव स्विकारावा लागला.

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

First published: April 18, 2019, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading