News18 Lokmat

शो मस्ट गो ऑन... (भाग 2)

26 / 11च्या बॉम्बस्फोटांच्या घटनांनी संपूर्ण देश हादरला. हा जगातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे उमटले आहेत. कित्येक नेत्यांची पदं गेली, खुर्चीवरही संक्रात आली आहे. या दहशतवादाच्या विरुद्ध बॉलिवुडही पेटलं आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतला एक संवेदनशील अभिनेता अशी अभिनेता अतुल कुलकर्णी याची ओळख आहे. या दहशतवादाचा त्रास त्यालाही झाला आहे. अतुल म्हणतो, " मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी जशी माझ्यावर कानावर आली तसा माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी ख्‌ूपच व्यथित झालो. भरपूर हळवा झालो होतो मी. मात्र त्यावेळेला काही करू शकत नव्हतो. हळुहळु माझ्या हळव्या मनाची जागा माझ्या बुद्धीने घेतली. - आपण या सगळ्या परिस्थितीला नेत्यांना जबाबदार धरतो. पण या नेत्यांना निवडून कोण देतो आपणच ना. कोणत्याही देशावर गुदरलेल्या संकटांची 20 टक्के जबाबदारी ही त्या देशाच्या नेत्याची असते आणि 80 टक्के जबाबदारी देशाच्या नागरिकांची असते. देशातले चांगले, सुशिक्षित मध्यमवर्गीय लोक राजकारणापासून दूर पळतात. त्यामुळे राजकारण नको त्या लोकांच्या हातात गेलं आहे. ते लोक आपल्यावर अगदी सहजच राज्य करतात. आपण त्याचे परिणाम भोगत आहोत." अभिनेता अतुल कुलकर्णी दहशतवाद, समाज मन आणि सिनेमावरही बोलला आहे. ते व्हिडिओवर ऐकता येईल.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2008 12:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2008 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...