घरकुल : मतिमंद मुलांसाठी हक्काचा निवारा (भाग - 1)

मतिमंद मुलांना सांभाळायचं हे आव्हान असतं. ते आव्हान अविनाश बर्वे आणि नंदिनी बर्वे यांनी पेललंय आणि ' घरकुल ' नावाचं मतिमंद मुलांचं वसतिगृह यशस्वीपणे चालवून समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला आहे. ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये अशा कर्तबगार आई-वडिलांच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला मिळालं.आपल्या मुलगा चार चौघांसारखा नाहीये हे नंदिनी बर्वेंच्या लक्षात आल्यावर त्या आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टर तपासणीत मुलगा बहिरा असल्याचं निदान झालं. मुलाशी संवाद साधता यावा म्हण्न नंदिनी बर्वेंनी मूक बधिरांचा कोर्स केला. पण त्या कोर्सचा त्यांना आणि त्यांच्या मुलांना काहीच उपयोग झाला नाही. कारण आपला मुलगा मंतिमंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बुवा, साधू, बाबा यांच्या नादाला न लागता, नको तिथे पैसा, वेळ आणि शक्ती खर्च न करता समोर असलेलं सत्य स्वीकारलं नि आपल्या मुलाचं,अमेयचं नाव मेजर काळेंच्या ' अस्तित्व ' या संस्थेत घातलं. " एकवेळ मूल अपंग असला तरी चालून जातं.पण मतिमंदत्त्व हा एकप्रकारचा शाप आहे. मतिमंदाचं शरीर जरी मोठं वाटत असलं तरी त्यांचा मेंदू, मानसिकस्थिती ही चार ते पाच वर्षांच्या मुलाची असते. अशामुलांना समाजाने, स्वीकारावं लागतं आणि समाजाने स्वीकारलं तरी आई-बापांच्या पश्चात अशा मुलांची मरेपर्यंत काळजी घेणारं कुणीतरी हवंय. हे बीज 'अस्तित्व'चे मेजर काळे यांनी आमच्या मनात रुजवलं... " अविनाश बर्वे ' घरकुल ' आणि ' अमेय पालक संघटने'च्या स्थापनेविषयी सांगत होते. त्यांचं सांगून संपलं नव्हतं, " मेजर काळेंच्या विचाराने आम्ही मतिमंद मुलांचे पालक प्रभावित झालो. आमच्या मुलांसाठी आणि आमच्यासारख्याच इतर मुलांच्या पालकांसाठी आम्हीच हक्काचा निवारा बनवायचं ठरवलं. मेजर काळेंना आमचा निर्णय आवडला. तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली की, ही मुलं आपली आहेत. सरकारची नाहीत. आपण स्वत:च्या खर्चानं आपल्या मुलांसाठी हक्काचा निवारा उभा करायचा. आम्ही पालकांनी डोंबिवली सहकारी बँकेत रिकरिंग अकाऊण्ट उघडलं. काही ठराविक रक्कम काही वर्षांसाठी आम्ही त्यात गुंतवली. रक्कम 1991मध्ये मॅच्युअर्ड झाली. मॅच्युअर्ड झालेल्या रक्कमेत थोडी भर घालून 1991मध्ये थोडी भर घालून ' घरकुल ' उभं केलं."' घरकुल 'ला ' युथ हॉस्टेल ', ' स्फुर्ती ', ' सी.डब्ल्यू.टी ', ' ठाणे कॉलेज ', ' डोंबिवली कॉलेज ', ' डोंबिवलीची ज्येष्ठ नागरिक संघटना ', ' विद्यानिकेतन शाळा ' मायेने भेट देतात. हे सगळे ' घरकुल ' च्या मुलांशी खेळतात, बोलतात, त्यांना लळा लावतात. तेही अगदी नि:स्वार्थपणे. ' घरकुल 'चा प्रवास आणि बर्वे दाम्पत्यांचे अनुभव तुम्हाला व्हिडिओवर पाहता येतील. पण जाता जाता नंदिनी बर्वेंनी म्हंटलेल्या कवितेने या ' सलाम महाराष्ट्र 'चा शेवट करू या. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीतज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीतज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळीने पाणी द्यावेआपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावेआभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावेमातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावर घ्यावे

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 08:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading